चष्मा का लागतो ?


 टीव्ही पाहिल्याने चष्मा लागतो हा एक गैरसमज आहे, मग चष्मा का बरं लागतो ?

“सारखे का रे बोलता?” “बाई, व्योमला फळ्यावरचं दिसत नाही. त्याला वाचून दाखवावं लागतं.” सातवी-आठवीच्या वर्गात असा संवाद सर्रास ऐकू येतो. त्या वयात मुलांची उंची झपाट्याने वाढते. त्याचसोबत त्यांच्या डोळ्यांची म्हणजे नेत्रगोलांची (Eyeballs) लांबीही वाढते. काहीजणांमध्ये ती लांबी प्रमाणाबाहेर वाढते. आपला डोळा कॅमेऱ्यासारखा असतो. बहिर्गोल नेत्रभिंगामुळे (Convex lens) दूरच्या वस्तूची प्रतिमा मज्जापटलावर (Retina) साकारते. तिथले मज्जातंतू (Nerves) ती माहिती मेंदूपर्यंत पोचवतात आणि ती वस्तू आपल्याला ‘दिसते’. बालपणात, तरुणपणी नेत्रभिंग (Lens) लवचीक असतं. वस्तू फार जवळ असली तर ते थोडंसं फुगीर होतं आणि प्रतिमा बरोबर नेत्रपटलावर केंद्रित करतं. [caption id="attachment_16647" align="alignright" width="300"] निकोप डोळा[/caption] नेत्रगोलाची लांबी फारच वाढली तर नेत्रभिंगाने कितीही चपट व्हायचा प्रयत्न केला तरी दूरच्या वस्तूची प्रतिमा मज्जापटलावर पडू शकत नाही. डोळ्यांसमोर योग्य अंतर्गोल भिंगं (Concave lens) ठेवली तरच ते साधतं. म्हणजेच ‘ऱ्हस्वदृष्टी’चा, Myopiaचा चष्मा लागतो. या लोकांना दूरचं दिसत नाही, पण म्हातारे झाल्यावरही त्यांना चष्म्याशिवाय छान वाचता येतं. काही लहान मुलांमध्ये नेत्रगोल (Eyeballs) जन्मतःच फार आखूड असतो. Lensने कितीही फुगीर व्हायची धडपड केली तरी जवळच्या वस्तूची प्रतिमा Retinaच्या मागेच पडते. त्यांना ब ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen