अवकाशात कोण कोण गेलंय ?

वयम्    मेघश्री दळवी    2020-03-03 10:00:47   

अवकाशात माणसांना पाठवण्याव्यतिरिक्त आणखी कोण कोण जाऊन आलंय माहितीये?- माश्या, वानर, उंदीर, कुत्री, कासव, मासे इत्यादी.. आणि आता आपल्या गगनयानातून जाणार आहे एक रोबोट- व्योममित्रा !

येत्या डिसेंबरमध्ये आपलं भारतीय गगनयान अवकाशात झेप घेणार आहे, ही बातमी तुम्ही ऐकली असेल. या यानात नेहमीची शास्त्रीय उपकरणं असतील; सोबत असेल व्योममित्रा- एक ह्यूमनॉइड. आता तुम्ही म्हणाल, ही कोण? तर ही आहे एक रोबोट. माणसासारखी दिसणारी रोबोट, म्हणून ह्यूमनॉइड. व्योम म्हणजे अवकाश. या अवकाशात मैत्रीपूर्ण संचार करायला आपली व्योममित्रा जाणार आहे. गगनयानात उपकरणांची देखरेख करणं आणि तिथल्या लाइफ सपोर्ट सिस्टमची चाचणी घेणं अशा जबाबदाऱ्या ती पार पाडणार आहे. गगनयानात ह्यूमनॉइड पाठवायची कल्पना खूप छान आहे. माणसांना अवकाशात पाठवायच्या आधी त्यांना काय अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज ह्यूमनॉइडवरून घेता येईल. खरं तर याच कारणासाठी, माणसांच्या आधी अवकाशात वेगवेगळे प्राणी नेण्याचे प्रयोग झाले आहेत. सुरुवात झाली ती साध्या माशीपासून. खरं नाही वाटत ना? आपल्या घरात इथेतिथे मुक्तपणे वावरणाऱ्या माश्यांच्या काही भगिनी अवकाशात जाऊन आल्यात ते? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवर अवकाश सुरू होतो असं साधारण मानलं जातं. १९४७ साली अमेरिकेने एका रॉकेटमधून काही माश्यांना १०९ किमी उंचीपर्यंत नेलं होतं. एका कॅप्सूलमध्ये बंदिस्त ठेवलेल्या या माश्या पॅराशूटच्या मदतीने पृथ्वीवर सुखरूप उतरल्या. त्यानंतर अवकाशातल्या विकिरणांचा (रेडिएशनचा) त्यांच्यावर काही परिणाम झाला का, हे पाहण्यासाठी त्यांची तपासणी करण्यात आली. तसा काही परिणाम न दिसल्याने आणखी प्रयोग करायला श ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बालसाहित्य , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen