सरोवरात पुन्हा 'जीवन' !

वयम्    शिवकन्या शशी    2020-03-19 10:00:36   

२२ मार्च– 'जागतिक जल दिन'... त्या निमित्ताने एका तलावाच्या पुनर्जीवनाची ही खरीखुरी गोष्ट!

  चेन्नईमधील वंदालूर प्राणीसंग्रहालयाच्या आवारातील सुमारे १८ एकरात पसरलेले सरोवर... पावसाळ्यात आजूबाजूच्या डोंगरांतून येणारे पाणी म्हणजे या सरोवराच्या पाण्याचा स्रोत. हे सरोवर म्हणजे प्राणीसंग्रहालयातील प्राणी, पक्षी, झाडं या सगळ्यांचा जीवनदाता. या तळ्याच्या बाजूने फेरफटका मारण्यासाठी फरशांचा बांधीव रस्ता होता. परंतु २०१६ मध्ये वरदा नावाचे भयानक चक्रीवादळ आले आणि आजूबाजूची झाडं उन्मळून पडली. सरोवराभोवतीच्या फरशा उचकटून गेल्या. पुढे २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षं तिथे भयानक दुष्काळ पडला. ऊन मी म्हणत असायचं! हे सरोवर बघता बघता सुकून गेलं. एरवी हिवाळ्यात दूरदूरचे पक्षी स्थलांतर करून इथे येत. सारा परिसर या पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाने फुलून जाई. परंतु त्यांची संख्या एकाच वर्षात कमालीची घटली. पाणीच नाही, तर पक्षी आणि कुठले जीव कशाला येतील? प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी प्राण्यांसाठी बाहेरून टँकरने पाणी मागवायला सुरुवात केली. परिस्थिती अवघड होती. संकटं माणसाची परीक्षाच बघतात. याचवेळी सुधा रामन या तरुण पर्यावरणप्रेमी वनअधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली. त्यांनी ही हलाखीची परिस्थिती नीट पाहिली. ‘इच्छा तिथे मार्ग’ असतोच, या विचाराच्या सुधा रामन यांनी या सरोवराचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्या कामाला लागल्या. आधी सरोवरातला गाळ खोदून त्याची खोली वाढवली. उकरलेल्या गाळाचे छोटे छोटे ढिगारे सरोवरातच ठिकठिकाणी घातले. त्यात अर्जुन, जांभूळ अशा जलद वाढणाऱ्या आणि पक्ष्यांना आकर्षित क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , पर्यावरण

प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      2 वर्षांपूर्वी

    छान लेख.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen