मुंगेरीचा उलटा चष्मा

वयम्    प्रवीण दवणे    2020-03-27 10:00:50   

हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणाऱ्या माणसाच्या जगातला उलटा चष्मा, प्राण्यांच्या जगात पोहोचला. हूप हूप करीत धमाल करणाऱ्या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल. (हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणा-या माणसाच्या जगातला उलटा चष्मा प्राण्यांच्या जगात पोहोचला. हुप्प हुप्प करीत धमाल करणा-या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल.) सगळ्या नातवंडात मुंगेरी अगदी द्वाड ! आजी-आजोबा मेटाकुटीला येत मुंगेरीला समजावता समजावता. मुंगेरीचे आई-बाबा लेकरांसाठी आणि त्यांच्या आजी-आजोबांसाठी कुठे फळं मिळतात का ते बघायला कोवळ्या उन्हाचं बोट धरूनच बाहेर पडत नि नाना-नानींवर मुंगेरी व चंदेरीला सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडे. चंदेरी ही अक्षरशः गुणी मुलगी होती. सक्काळीच आई-बाबांनी शिकवलेल्या नव्या धड्याचा ती सराव करीत असे. छोट्या फांदीवर तोल सावरून कसं बसायचं, एका फांदीवरून दुस-या फांदीवर झुपकन् उडी कशी मारायची, जाळीतून कोवळी करवंद काढताना हाताला काटा कसा लागू द्यायचा नाही; माणसांनी टाकलेल्या पुडीतल्या शेंगदाण्याऐंवजी –नव्यानं येणा-या कैरीचा आंबटपणा कसा गोड मानायचा असा सगळा सराव नाना-नानींच्या देखरेखीखाली छान करायची. पण हा धाकटा मुंगेरी- थोडा-थोडा नाही अधिकंच ‘अधिक’! नाना-नानी अगदी मेटाकुटीला येत असत. ‘अरे, मुंगेरी नुसता रस्त्यावरच टुक् टुक् बघत, कुणी एखादं अर्ध फळ फेकेल का, याची वाट पहात रहाशील तर आळशी होशील. न् राजा, आळशांना आपल्या प्राणी जगात थारा नाही रे!’ असं समजावता समजावता लालीनानी हैराण व्हायची. पण मुंगेरी हट्टी- तो म्हणायचा, ‘लाली नानी , अगं, इथं बसून केळी मिळतात, चणे मिळतात, मग कशाला धावाधाव क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen