करोना विषाणूमुळे घरातच वेळ घालवत असताना आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो, हे मुलांकडून समजून घेण्यासारखे आहे. रोजच्या रोज ‘वयम्’च्या वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहेत. सिंधुदुर्ग ते गडचिरोली अशा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-पश्चिम सीमाभागांतूनही मुलांचे अनुभव-लेख आले आहेत. या संभ्रम-काळाबद्दल वाटणारी हुरहूर, चिंता आपल्या लेखनातून ही मुलं प्रकट करत आहेत. रडत, कंटाळत न राहता त्यांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. त्यांचे अनुभव, नव्या जाणिवा त्यांच्याच शब्दांत, पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका.. वाचताय ना? आज वाचा भाग- 2.
अनुभव भाग- 2.
1. भांडी छान कशी घासायची, हे शिकलो! परीक्षा होणार नाही म्हणजे आता अभ्यास करावा लागणार नाही असे आधी वाटले, पण मग लक्षात आले की, मला गणित हा विषय फारसा येत नाही, तर तो जरा ताईकडून शिकून घ्यावा. त्यामुळे मी रोज गणित शिकतो आहे. आईबाबा एवढा काळ घरात, हे मी प्रथमच अनुभवतोय. घरात आईला पापड, आलूचे चिप्स करायला मदत केली. चिप्स कसे करायचे ते छान समजले. या काळात मी भांडी छान घासायला शिकलो. हे काम प्रत्यक्ष करायला लागल्यावर ते काम छान रीतीने कसे करायचे ते कळले. भांडी घासताना खरकट्या भांड्यांमध्ये पाणी टाकून ठेवले नाही, तर भांडी घासताना हात दुखतो.. जळलेली भांडी घासायला तर फारच मेहनत घ्यावी लागते. अशी भांडी घासायला आईला खूप त्रास होत असेल ना, पण हे काम प्रत्यक्ष केल्यावरच माझ्या लक्षात आले! माझ्याकडे गोष्टीची बरीच पुस्तके आहेत. मागच्या वर्षी मी ‘तोत्तोचान’ वाचले होते. त्यानंतर मी पुस्तके वाचलीच नाहीत. शाळेच्या अभ्यासाम ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .