‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव - भाग 3

वयम्    शुभदा चौकर    2020-04-20 12:47:51   

‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, तुम्ही ही अनुभव-मालिका? आज वाचा भाग 3.

अनुभव भाग 3

  हेच तर खरे देव! पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द... अरे वा! मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. इतकी वर्षे जी भोलेनाथची प्रार्थना केली, ती प्रत्यक्षात आली- ‘सांग सांग भोलेनाथ सरकारी आदेश येऊन  परीक्षा रद्द होतील का?’ काय मज्जा ना! पण दुसऱ्या क्षणी वाटलं, ‘परीक्षा नाही म्हणजे स्पर्धा नाही. आपल्याला स्वतःची क्षमता ओळखायची तर परीक्षा हवीच! कशाला आला हा करोना? मैदानी खेळ नाही, उन्हाळी सुट्टीचे कॅम्प नाहीत, मामाच्या गावाला जाऊन कैरी, करवंद काढण्याची मज्जा नाही. काय हे भलतंच संकट आलंय? मग मी चित्रं काढू लागलो. पुस्तकं वाचली. लेख लिहू लागलो. मी घरात बसून बैठे खेळ, पत्त्यांचे विविध गेम शिकलो. पत्त्यांचे घर तयार करताना मन एकाग्र करावे लागते, हे लक्षात आले. घरच्या घरी मास्क कसे बनवायचे ते आईकडून शिकलो. आपल्या देशातील लोकांवर दैवतांचा भला मोठा पगडा आहे, परंतु टीव्हीवरील बातम्या ऐकत असताना मला जाणवलं की बिचारे डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी व पोलिस हेच तर आपल्या मदतीला धावून आलेले आहेत; स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या मुलाबाळांची चिंता न करता! हेच तर सगळे आहेत जे फक्त 'मानवताधर्म' निभावत आहेत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen