‘वयम् ’च्या मुलांचे सुट्टी अनुभव - भाग 4

वयम्    शुभदा चौकर    2020-04-27 14:37:46   

‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख  आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, ही अनुभव-मालिका? आज वाचा भाग 4.

 

आज वाचा भाग 4.

नवे खेळ, नवी निरीक्षणे

कालच आम्ही एक भिंत रंगवली. शिवाय आम्ही एक संवादशिडी बनवली  आहे. हा खेळ सापशिडीसारखा  आहे, पण वेगळा! प्रत्येक घरात वेगळे पर्याय आहेत. एका घरात टाळ्या वाजवा, दुसर्‍यात- आजी आजोबांचे  संपूर्ण नाव सांगा, राष्ट्रीय  फूल सांगा, इत्यादी. खूप मजा येते हा नवीन खेळ खेळायला. भाजी चिरणे, फोडणी देणे, कपबशी विसळणे, कपड्यांच्या घड्या करणे, लादी पुसणे अशी कामे करतेय. आई रोज घरात किती काम करत असते, हे आता कळतंय... यापुढे नेहमीच आईला मदत करेन. शिवाय आम्ही घरच्या घरी सॅनिटायझर बनवलंय. ते वापरून आम्ही रोजच्या रोज सर्व दारे, हॅन्डल्स, नळ वगैरे पुसून घेतो. तसेच आम्ही fb live वरचे काही चांगले कार्यक्रम पाहतो. पुलंची नाटके तसेच  हृषिकेश  मुखर्जी यांचे सिनेमे  बघतो. सगळे मिळून एकत्रित वाचन करतो. ‘वयम्’ मासिकाने आधीचे अंकही ऑनलाइन उपलब्ध करून पर्वणीच दिलीय आम्हांला! मी सध्या कथ्थकचा सरावही करतेय. रोज शुद्धलेखन आणि अक्षर वळणदार कसे काढावे ह्याचा सराव करतेय. छोटे छोटे विज्ञान प्रयोग करून पाहतेय. आमच्या आजूबाजूला झाडे आहेत, त्यावर नाचण, बुलबुल, वटवट्या, चिमण्या जवळून बघता येतात. गेल्या आठवड् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen