‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 5

वयम्    शुभदा चौकर    2020-04-29 10:38:26   

मुलांना एरव्ही मोकळा वेळ मिळणे दुर्मीळ झाले आहे. शांत, निवांत वेळ मिळताच ही मुले किती वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात, बघा. वयम् वाचक मुलांच्या अनुभव-लेख मालिकेचा हा 5वा भाग!    

अनुभव-लेख भाग- 5

   

मनमोहक नर्सरी

सगळीकडे ‘बंद’ची कुणकुण लागताच आम्ही पुण्यापासून जवळच असलेल्या माझ्या आजोळी येऊन दाखल झालो. आज्जी-आजोबांच्या मोठ्या घरात मामा, मामी आणि भावंडांनी भरलेल्या गोकुळात मी रमून गेलो.  नंतर मात्र मित्रांची आठवण येऊन मी आईच्या मागे भुणभुण सुरू केली... ‘बोअर झालोय’ हा जप ऐकून तिने मला समजावले की, आलेल्या संकटाकडे त्रास म्हणून न बघता संधी म्हणून बघ, म्हणजे सुचेल काहीतरी. आणि खरंच तसं झालं. एक दिवशी दुपारी सगळीकडे सामसूम झाल्यावर माझ्यातला चित्रकार जागा झाला. परसातल्या लालभडक कुंडीवर पांढरी वारलीची नक्षी काढली. त्यात इवलीशी हिरवीगार रोपं लावून, मनमोहक नर्सरीच तयार झाली. काळ्याकुट्ट टायरवर पांढरीशुभ्र वारली चितारल्यावर कुणी कल्पनाही केली नसती की, त्याच्या सुंदर बैठका होतील, किंवा झाडाला टांगल्यावर आईला हिंदोळ्यावर बसून झोके घेता येतील आणि छोट्या विषुला फोटोसाठी छान ठिकाणही मिळेल. घरातल्या सगळ्यांनी माझं कौतुकही केलं. या सगळ्यात माझा छान वेळ गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा आत्मविश्वास वाढला. आईच्या मागे भुणभुण नसल्यामुळे तीही खूश. लहान भावंडांना सहभागी करून घेतल्यामुळे ती  मजेत रमली. आणि या सगळ्यांना खूश पाहून आज्जी-आजोबा पण सुखावले. मी ठरवलंय की, करोना तर हद्दपार होईल, लॉकडाऊनही संपेल, पण यापुढे मी मात्र महिन्यातल्या एका रवि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.