मुलं वाचत नाहीत.. त्यांना अभ्यास नकोसा वाटतो... ही गृहितकं चुकीची आहेत. निदान ‘वयम्’ मासिकाशी निगडित असलेली मुलं तरी छान वाचतात, स्वतः स्वतःला हवं ते आवडीने शिकतायत. त्यासाठी मनापासून अभ्यास करतात. संधी, वेळ आणि वाव मिळताच ही मुलं किती काय काय करताहेत, बघा! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका? वाचा भाग- ६
अनुभव भाग- ६
वाचनात रममाण सुट्टीच्या पहिल्या दिवशीच अतुल देऊळगावकर यांचं ‘ग्रेटाची हाक’ हे पुस्तक हातात घेतलं आणि बघता बघता संपवलंसुद्धा! ‘ग्रेटाची हाक’ पुस्तक वाचताना मी किती वेळेस तरी आईजवळ रडले. मग आईने सांगितलं की, तुला जे वाटतं ते लिहून काढ; आणि वहीवर लिहून काढलं. ते आईच्या मदतीने देऊळगावकर सरांना इ-मेलने पाठवलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया आली आणि एक-दोन वेळा फोनसुद्धा आला. आभाळ ठेंगणं झालं होतं! आई म्हणाली, “बाळा, एवढ्याने हरखून जाऊ नकोस आणि इथे थांबूही नकोस.” मग माझी गाडी पुन्हा वाचनावर आली. ‘द डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे पुस्तक घेतलं. त्या पुस्तकातून मी काय शिकले हे शब्दांत मांडू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा झालेला अमानुष छळ वाचून खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. यानंतर मी ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हे पुस्तक वाचलं. हे तर माझ्या खूप आवडीच्या लेखिकेचं पुस्तक! सुधा मूर्ती यांनी त्या पुस्तकात खऱ्या घडलेल्या 20 गोष्टी लिहिल्या आहेत. धनंजय कीर यांचं ‘महात्मा फुले’ हे चरित्रही मी वाचलं. महात्मा फुले ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .