‘वयम्’ अनुभव मालिका भाग- ७ : मदत घेण्याची कला!

वयम्    शुभदा चौकर    2020-05-04 14:13:10   

अचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका? वाचा भाग ७.

   नॉलेज, स्किल अप  तसं बघितलं तर सुट्टी काही मला नवीन नाही, कारण तिसरीनंतर मी दोन वर्षे शाळेमध्ये गेलोच नाही. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी होम स्कूलिंगचा मार्ग पत्करला होता.  त्या दोन वर्षांत मी माझ्या आवडीच्या विषयांचा अभ्यास केला- गणित व कॉम्प्युटर. मग 2019 मध्ये सहावीत प्रवेश घेतला आणि मी होमवर्क, वेगवेगळ्या परीक्षा यात अडकलो. दररोज सायकल फिरवायची राहूनच जायचं.  आता गच्चीवर  रोज सायकल फिरविण्याचा आनंद उपभोगतो. रोज सकाळी केर काढायला, फरशी साफ करून आईला मदत करायला शिकलोय. आमच्या घरी टीव्ही नाही. पण इंटरनेटच्या साह्याने मला वाटेल त्यावेळी मी ‘रामायण’ बघतो. इतिहास विषयसुद्धा असा गोष्टीरूपात शिकवला जावा आणि इतिहास विषयाची परीक्षा नसावी, असं माझं ठाम मत आहे. दिल्ली  येथील ‘अविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून मी ॲप बनवायचं  प्राथमिक ज्ञान  मिळवलं.  गुगल तसेच MIT या  अमेरिकन संस्थांनी  MIT A ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    मुलांना खुप प्रोत्साहन देणारी मालिका!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen