घरी असतानाही खूप काही शिकता येतं, याचे धडे या काळाने मुलांना दिले. मुलांनी घराची प्रयोगशाळा केली आणि पापड, केकपासून सॅनिटायझरपर्यंत काय काय करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 8 मध्ये मुलांच्या मनमुराद प्रयोगांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा अनुभव भाग-
घरी बसून भाषण स्पर्धेत सहभाग या सुट्टीत कॅरम, बुद्धिबळ, लुडो सर्व सर्व गेम खेळून झाले आणि शाळेची आठवण येऊ लागली. अशात अचानक एक दिवस आमच्या शाळेच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर मॅडमचा मेसेज आला की, आजपासून आपण रोज नवीन नवीन शिकणार आहोत आणि मज्जा करणार आहोत. मग काय, आमचे सर्व शिक्षकवृंद आम्हांला रोज अभ्यास पाठवू लागले. आणि तो अभ्यास वेळेत पूर्ण करून सगळ्यात आधी फोटो कोण पाठवतो यासाठी आमच्या सर्वांमध्ये स्पर्धाच लागली. दर रविवारी ऑनलाइन टेस्ट सोडवताना लेखी पेपरपेक्षा जास्त मज्जा यायची. त्यात सर्वांत जास्त मार्क मलाच मिळत असल्याने मी ऑनलाइन टेस्टची आतुरतेने वाट पाहत असते. आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी भाषणाची एक ऑनलाइन स्पर्धा झाली आणि मला घरी बसून भाषण स्पर्धेत भाग घेता आला, याचे खूप अप्रूप वाटले. ऑनलाइन प्रमाणपत्रदेखील मिळाले. माझे आईबाबा डॉक्टर असल्याने करोना होऊ नये, म्हणून कशी काळजी घ्यायची ते सांगत असतात. मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना फोन करून ती माहिती देते. मी दररोज रामायण, महाभारत, चंद्रगुप्त मौर्य या मालिका पाहाते. या मालिकेतील महत्त्वपूर्ण आणि चांगल्या घटनांची आणि वाक्यांची वहीत नोंद करून घेते. या महाकाव्यांमधून मी शिकतेय की, कधीही आपल्याजवळ असलेल्या विशेष गुणांचा गर्व क ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .