‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग ९ मध्ये मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा अनुभव भाग- ९
गंध मातीचा मनात झिरपला! माझं दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे या उन्हाळी सुट्टीची वाट मी बऱ्याच दिवसांपासून पाहत होते. मी ठरवलं होतं, बाबांनी काढून ठेवलेली निवडक पुस्तकं वाचायची आणि मातीच्या छोट्या छोट्या भांड्यांवर पेंटिंग करायचं. जानेवारी महिन्यात, एक माणूस लहान, मध्यम आकाराचे मातीचे खूप पॉट घेऊन विकत होता. अगदी मस्त आकार होते त्या सुगडांचे. आईने ते पॉट घेऊन ठेवले होते. सुट्टी लागल्याबरोबर मी कामाला लागले. हे मातीचे सुगड पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले. खमंग भाजलेली माती असावी. धुऊन कापडाने पुसताना त्याचा मस्त वास येत होता. हळुवारपणे ब्रश रंगात बुडवून त्या पॉटवरती रंगवण्यात एक विलक्षण मजा आली. मी या पॉटवर वारली डिझाइन, नारळांच्या झाडांचे आकार असं जे जे वाटलं ते ते केलं. आई, बाबा व माझ्या लहान्या भावालाही हे पॉट खूप आवडले. बाबांनी तर आमच्या घरातील हॉलमधून वर जायच्या एका एका पायरीवर एकेक पॉट अशी मांडणी केली. या मांडणीमुळे सगळे पॉट एकत्रित खूप छान दिसत होते. मनातल्या गोष्टी, मनापासून करता आल्यानंतरचं फिलिंग कसं मस्त असतं, ते मी अनुभवलं.-जान्हवी श्रीराम गव्हाणे, दहावी
टायनी एंजल्स स्कूल, नांदेड
लेखणी आणि ब्रशचा मुक्त वापर खूप निवांत वेळ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .