'वयम्' अनुभव मालिका भाग- १० : विस्मृतीतील कलांची ओढ !

वयम्    शुभदा चौकर    2020-05-15 12:35:19   

 मोकळा वेळ ही पर्वणी वाटलीये मुलांना. शाळा, होमवर्क, ट्यूशन क्लास यांनी गच्च झालेल्या दिवसांत मुलांना छंद जोपासायला वेळच मिळत नाही. भरतकाम, शिवणकाम, बागकाम या कला तर फार मागे पडतात. करोनाच्या सुट्टीत काही मुले या विस्मृतीतील कलांकडे वळली. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमामुळे ही मुले लिहिती झाली. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचा भाग १०.

  शिवणकाम, बागकाम शिकलो मी कडावल  गावात राहतो. आमचं मेडिकल स्टोअर्स व किराणा दुकान आहे. मास्क व  सॅनिटायझरसाठी लोकांची गर्दी होऊ लागली.  त्याचा तुटवडा होता. मास्क कमी असल्यामुळे ती रात्रीच्या वेळी मास्क शिवायची. मी तिच्याकडून शिवणकाम शिकून घेतले आणि सुती कापडाचे दुहेरी थर असलेले १०० मास्क बनवले. शिवाय मी जनजागृतीसाठी विविध बोर्ड बनवले आणि आमच्या दुकानात लावले. माझे हस्ताक्षर खूप खराब आहे, पण मी माझा मित्र जयवर्धन केणी याला कॅलिग्राफी करताना बघितलं होतं. त्याचा थोडाफार उपयोग मला हे बोर्ड बनवताना झाला.  घरी वापरण्यासाठी कोरफड व स्पिरीट यापासून सॅनिटायझर बनवला आहे. तसेच मी जादूचे प्रयोगही शिकत आहे. आईला व आजीला  स्वयंपाक करण्यात मदत करतो.  बटाट्याचे  अप्पे, फणसाचे वडे, केक असे पदार्थ बनवले.  मला शाकाहारी पदार्थ आवडत नाहीत, नॉनव्हेज आवडते. पण करोनाच्या भीतीमुळे मी आता रोज भाज्या खातो, तसेच दुधात हळद घालून गरम गरम दूध पितो. सकाळच्या सत्रात मी आमच्या बागेमध्ये  झाडे लावणे,  झाडांना पाणी घालणे, पाण्यासाठी पाट खणणे अशी विविध कामे करत असतो. नारळाच् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen