एरव्ही दुर्मीळ असलेला वेळ मिळाल्यावर मुलं बारीक निरीक्षण करतात. अनोखे अनुभव मनापासून उपभोगतात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचा भाग- 11.
चंद्रच माझ्यापाशी! या सुट्टीत रोज आम्ही गच्चीवर जाऊ लागलो आणि ही जागा हळूहळू माझ्या आवडीची झाली. टाकीवर चढून उंचावरून सर्वत्र पाहायचं आणि रोज ढगांचे वेगवेगळे आकार, सूर्यकिरणांच्या आणि सूर्यास्ताच्या वेगवेगळ्या छटा यांचा अनुभव घ्यायचा! खूप निवांत वाटलं. एकदा मनात आलं की, आज आपण गच्चीवर झोपावं. मोकळ्या, चांदण्यांनी भरलेल्या आकाशात झोपायला सुरुवातीला छान वाटलं, पण डासांनी आमचा सगळा बेत हाणून पाडला. रात्री दोन वाजता मी आईला विनवण्या करून करून घरात आले. सगळे मला खूप हसत होते. खोलीत आल्यावर मी पाहिलं की, चंद्राच्या प्रकाशाचा एक हलकासा झोत माझ्या खिडकीतून खोलीत आला. तो क्षण नजरेत आणि मनात भरून राहिला. मनात आलं, ज्यासाठी एवढा अट्टहास केला, तो चंद्र तर माझ्याच खोलीत आला की! या काळात मला आवडलेली गोष्ट, म्हणजे माझी आई सतत माझ्यासोबत घरात होती. एरव्ही ती ऑफिसातून लवकर घरी यावी यासाठी मला हट्ट करावा लागतो. अलीकडे मी छान पोळ्या करायला शिकले. दादाची व माझी मऊ पोळ्या करण्याची स्पर्धा सुरू झाली. शिवाय मला कविता करण्याचं वेड लागलं. मनाप्रमाणे कविता सुचल्याने मला प्रसन्न वाटलं. एकदा भिंती घासूनपुसून स्वच्छ केल्या. पुस्तक वाचलं. वेगवेगळी गाणी ऐकली. जुन्या कपड्यांपासून पायपुसणं शिवलं. रोज मला मी वेगवेगळ्या रूपांत, वेगळ्या गोष्टींत सापडू लागले... - ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .