भाग 12 : घरोघरी छोटे शेफ!

वयम्    शुभदा चौकर    2020-05-24 09:57:53   

स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची प्रयोगशाळा. पण व्यग्रतेमुळे मुलांना या घरच्या शाळेत वावरायला वेळही नसतो आणि वावही नसतो. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे मुलांचे पाय स्वयंपाकघरात खेचले गेले. लुडबूड करता करता ही मुले किचन चॅम्पियन झाली की! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात जी शेकडो मुले लिहिती झाली, त्यांतील अनेकांनी त्यांच्या ‘शेफ’गिरीबद्दल लिहिलंय! वाचा- भाग 12

स्वयंपाक-  भ्रम ते आवड! मम्मीला फर्माइश करायची, आणि तिने केलेला पदार्थ जरा आवडला नाही की नावं ठेवायची, एवढंच आतापर्यंत केलं होतं. स्वयंपाक ही सोपी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात किती कठीण आहे, हे पहिल्याच प्रयोगात अनुभवलं. बासुंदी म्हणजे दूध फक्त आटवायचं असतं, त्यात काय विशेष, असं वाटायचं? पण 41 डिग्रीच्या उकाड्यात गॅसजवळ उभं राहून दूध तळाला करपू न देता अविरत ढवळून घामाघूम झाल्यावर काय होतं, याची कल्पना आली.  आता तर मी पूर्वतयारीपासून ओटा आवरण्यापर्यंत सगळं काम पूर्ण करायला शिकलोय. चाट बनवताना आधी जिभेवर ताबा ठेवण्यापासून ते कटलेटसाठी काळजीपूर्वक भाज्या बारीक चिरताना लागणारा पेशन्सही आलाय. अजून एक गोष्ट म्हणजे समस्त ‘होममेकर’ महिलांबद्दलचा माझा आदर अजून वाढला. त्यांनां 'सॅल्यूट' म्हणून भविष्यात मी स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये मोठा शेफ व्हायचा विचार करतोय. -आदित्य क्षीरसागर, दहावी पंडितराव आगाशे हायस्कूल, लॉ कॉलेज रोड, पुणे.   बहुरंगी सुट्टी या काळात दिवसभर भरपूर व्यायाम, अभ्यास, वाचन, छंद जोपासणं यात माझा वेळ छान जाऊ लागला. मुख्य म्हणजे या सुट् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen