'वयम्' अनुभव-लेख मालिका 15 : संयमाची रुजवण

वयम्    शुभदा चौकर    2020-06-06 09:59:01   

मुलांना पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळण्याची सवय बहुतांश घरांतून लागलेली असते. लॉकडाउनमुळे त्यांना जाणीव झाली की, आपल्याला जे जे हवेसे वाटतेय ते आत्ता मिळू शकणार नाही. आहे त्यात समाधान मिळवावे लागेल. कौतुक हे, की मुलांनी हाही धडा आनंदाने आत्मसात केला या काळात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुले लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या... वाचा 'वयम्' अनुभव-लेख मालिका 15’ -

  संयम आणि स्वावलंबन या विषाणूमुळे मनसोक्त भटकणे तर दूरच, पण घराबाहेर पाऊल टाकणेही अवघड झाले. खूप वाईट वाटलं, राग आला. हे सगळं आत्ताच का, असंही वाटलं. पण असं वाटून काही उपयोग होणार नाही, हेसुद्धा लक्षात आलं. घरातल्या घरात करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, याचा साक्षात्कार झाला. कपाटात बंद असलेली पुस्तके बाहेर आली. कितीतरी छान छान पुस्तके अजून उघडली नव्हती, हे ध्यानी आले. गेले वर्षभर एका कोपर्‍यात ठेवलेल्या पेटीकडे लक्ष गेलं. चित्रकला आणि हस्तकला हे तर माझे आवडते विषय. यावर्षी त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता मात्र चांगलीच संधी मिळाली. याशिवाय किचनमध्ये प्रयोग करता आले. काहीही वाया जाऊ नये म्हणून आईने मला काही नवीन प्रकारच्या भाज्या करायला शिकवलं, ज्यात भाजीच्या प्रत्येक भागाचा वापर झाला. माझी आणखी एक आवडती गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे निरीक्षण करणे. आमच्या इमारतीसमोरच्या झाडांवर बुलबुल, चिमणी, दयाळ, शिंजीर अशा पक्ष्यांचा सतत वावर असतो. चिंचेच्या झाडाची फांदी आमच्या घरातील खिडकीच्या गजांमधून किंचित आत येत असल्यामुळे तेथून ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.