“आजच्या पिढीला शिस्त नाही,” असा आरोप मोठी माणसं अनेकदा करतात. हा आरोप सपशेल खोटा पाडलेली अनेक मुलं भेटली आम्हांला... अर्थात त्यांच्या पत्रांतून! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा, या मुलांनी गेल्या दोन महिन्यांत किती गोष्टी करून पाहिल्या... त्याही अगदी शिस्तीत! कोण म्हणू धजेल की आजची मुलं बेशिस्त आहेत? .. वाचा ‘वयम्’ अनुभव-लेख मालिका 14-
करोना फायटिंगच्या कामात छोटीशी मदत! मी दिल्लीला राहते. मी या दोन महिन्यांत काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या, त्याबद्दल तुम्हांला सांगणार आहे. या दोन महिन्यांत माझे तीन दात पडले. ह्या तीन दातांपैकी एक दात तर माझ्या आजीच्या वाढदिवसाला पडला. जेव्हा मी दुसरीत होते, तेव्हा माझ्या मैत्रिणींचे माझ्यापेक्षा जास्त दात पडले होते. आता लॉकडाऊननंतर जेव्हा केव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणी दात पडण्याच्या बाबतीत सेम सेम असू बहुतेक! मी माझ्यासाठी पेन्सिल ठेवण्याचा पाऊच तयार केला. त्यासाठी मी बिस्किटाचा रिकामा खोका घेतला. त्या खोक्याला कोरा कागद चिकटवला. खोक्याच्या उघड्या बाजूला कागद लावला नाही. रिकाम्या बाजूने पेन्सिली ठेवायच्या खोक्यात! या दोन महिन्यांत अधूनमधून कंटाळा येत असला तरी मी खूशही होते. कारण-आई बाबा घरीच होते आणि माझ्याबरोबर रोज खेळतही होते. आम्ही रोज एकत्र जेवतो. आम्ही एकमेकांना जेवण वाढतो. इथे दिल्लीत आता खूप गरम होतंय, त्यामुळे जेवताना आम्ही एकमेकांना माठातलं थंडगार पाणी देतो. मी स्वयंपाक करायला शिकले. रोज दुपा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शिक्षण
, पालकत्व
, बालसाहित्य
vilasrose
5 वर्षांपूर्वीलेख आवडला.मुलांना स्वावलंबन शिकवणे हे खूपच महत्वाचे काम आहे.