डॉ. अरुणा ढेरे, यंदाच्या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष या एक ज्येष्ठ साहित्यिक. त्यांच्या ललितलेखाचा काही अंश तुम्हाला वाचायला देत आहोत. ज्येष्ठ साहित्यक डॉ. मीना वैशंपायन यांनी खास आपल्यासाठी हा लेख संपादित केला आहे. चांदोबा चांदोबा भागलास का? ते घर म्हणजे मोठा वाडाच होता.जुन्या घराला लागून बांधलेला. मध्ये मोठा चौक असलेला वाडा.अंगणात आवळीची, लिंबाची आणि कसली कसली झाडे होती. वाड्यात आजी होती. आजीच्या मुलाचा संसार होता. अधूनमधून मुलीची मुले आजोळी राहायला येत. त्यांच्या हसण्याभांडण्याचे आवाज वाड्यात नादत राहत. प्रेम आणि माया यांनी भरून गेलेले ते वातावरण होते. एकदा कधीतरी तिन्हीसांजेला आजी मुलांना घेऊन अंगणात बसली होती.आवळीचे सावळे झाड माथ्यावर होते. मुले गोष्टी करत होती, गाणी म्हणत होती. अंधार हळूहळू दाटत आला. आजीच्या गोष्टी ऐकता ऐकता एका नातवाचे लक्ष गेले ते पूर्वेकडे. पूर्वेच्या लिंबामागून चांदीच्या धारेसारखी चंद्राची कोर आभाळात तळपत होती. तो थरथरला.आनंदाने उसळला. त्याने सगळ्यांना तो नवा चंद्र दाखवला. चौथीचा चंद्र आणि सगळेच टाळ्या पिटत गात सुटले. ‘चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ?’ ज्याने ती कोर प्रथम पाहिली, तो आपल्या आजोळघरी आलेला लहानगा मुलगा होता. त्याच्यासाठी ते गाणे खरोखरी त्याच्याच अनुभवाचे होते. मामाचा तसाच चिरेबंदी वाडा होता, तसेच लिंबोणीचे झाड होते. आणि त्यामागे उदयाला आलेला तसाच सतेज चंद्र होता. मुलाच्या आनंदा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .