'२७ फेब्रुवारी हा राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. ह्या उपक्रमामागील प्रेरणा कोणती? ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेवरील प्रेम व त्या मागील आग्रह नेमका का बरं ? आणि या भाषाप्रभू महाकवीने आपल्या कवितेतून भाषेचा संपन्न वारसा कसा दिला? हे सांगणारा विशेष लेख, खास 'वयम्’ बालदोस्त व त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी... महाकवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवाने साजरी केली जाते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. मराठी भाषा समृद्ध आणि संपन्न करण्याचं कार्य वि.वा.शिरवाडकर यांनी केलं, हे आपल्याला माहीत आहेच. ज्ञानपीठ पुरस्कारानेही त्यांच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मान झाला. 'जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९३३ साली प्रकाशित झाला, परंतु जेव्हा त्यांचा 'विशाखा’ हा कवितासंग्रह (१९४२) साली प्रसिद्ध झाला, तेव्हा साहित्यातील ज्येष्ठांचे लक्ष्य 'विशाखा’ने वेधून घेतले. कल्पनेची उत्तुंग झेप, शब्दांची तेजस्वी झळाळी आणि मराठी भाषेचे रत्नजडित सौंदर्य यामुळे 'विशाखा’ काव्यसंग्रहाच्या रूपाने मराठी कवितेत दीपस्तंभच उभारला गेला. त्यानंतर समिधा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा वादळवेल, छंदोमयी, मुक्तायन.. नावे तरी किती घ्यावीत! कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी केवळ काव्यलेखन केले नाही, तर नाटक, कथा-कादंबरी, ललित-वैचारिक अशा अनेक वाङ्मय प्रकारांत त्यांनी लेखन केले. कुसुमाग्रज हे त्यांनी काव्यलेखनासाठी घेतलेले नाव, पण आपल्याला माहीत आहेत विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि.वा.शिरवाडकर. या त्यांच्या मूळ नावाने त्यांनी विपुल असे गद्यलेखन केले.हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रासंगिक , भाषा , व्यक्ती विशेष , साहित्य रसास्वाद
प्रतिक्रिया
भाषाप्रभू कुसुमाग्रज
वयम्
प्रवीण दवणे
2019-02-25 18:25:10

वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 7 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.