अद्भुत अंटार्क्टिका भाग २


सूर्याच्या आकाराचा दिसणारा चंद्र, हिऱ्यासारखे चमचमणारे तारे, ताशी दोन-अडीचशे कि.मी. वेगाने घोंघावणारे वारे... अद्भुतरम्य आणि नितांतसुंदर खंड आहे अंटार्क्टिका ! भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. ‘अंटार्क्टिका’- आपल्या पृथ्वीवरील अतिशय खडतर, परंतु नितांतसुंदर व आश्चर्यकारक भूभाग! मैलोन् मैल अंथरलेली बर्फाची चादर, असंख्य हिमनद्या आणि नि:स्तब्ध करणारी शांतता! मानवाचा स्पर्श न झालेल्या आणि पृथ्वीच्या कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक सौंदर्याची झलक म्हणजे अंटार्क्टिका! हे तर भूतलावरून स्वर्गलोकाकडे जाणारे द्वार... नाही-नाही, जणू स्वर्गलोकच! सूर्याचे रूप म्हणजे अक्षरश: ‘तेजोनिधी लोहगोल.. भास्कर हे गगनराज!’ अशा ह्या गगनराजांच्या आगमनाची वर्दी चहूबाजूंनी होणाऱ्या अलौकिक स्वर्गीय रंगांच्या उधळणीने मिळते. जणूकाही पंचमहाभूतांचा साक्षात्कारच! भूमीवर अंथरलेली बर्फाची पांढरीशुभ्र चादरही या रंगात न्हाऊन निघते.. नोव्हेंबर ते फेब्रुवारी येथे सूर्य मावळतच नाही. मध्यरात्रीसुद्धा आकाशात सूर्य तळपतो. (Midnight Sun). आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे, येथे आकाशात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे क्षितिजाला समांतर फिरताना दिसतात. पूर्वेला सूर्य उगवणे, मध्यान्हीला डोक्यावर येणे आणि संध्याकाळी तो पश्चिमेला मावळणे वगैरे आपल्याला इकडे नेहमी अनुभवास येणारा काही प्रकारच नाही. [caption id="attachment_8880" align="alignright" width="300"]

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , बालसाहित्य , स्थल विशेष
स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. Ninad Athalye

      3 महिन्यांपूर्वी

    सुंदर लेख

  2. Sangeeta Joshi

      3 महिन्यांपूर्वी

    डॅा मधुबालांनी अंटार्टिकाचे चित्र डोळ्यासमोर उभे केलेआहे. प्रत्यक्ष हा अनुभव घेता येणार नाही याची खंत वाटते.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen