पुलवामा येथील केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ल्यानंतर जो तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा निषेध, संताप व्यक्त करू लागला. काहीजण मोटारबाईकवरून घोषणा देत फिरले. कुणी रेल्वेगाड्या बंद पाडल्या. कुणी रस्ते अडवले. कुणी फेसबुक, व्हॉटस्अपवरून मनाला येतील तशा सूचना करत सुटले. मागोमाग भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मोठी कारवाई केली. त्यानंतर तर समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा व सल्ल्यांचा पाऊस पडू लागला. अशा संहाराच्या काळात आपल्या आजूबाजूला असलेल्या मुलांना काय वाटेल, त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना दाटून येतेय का, याचा आपण मोठी माणसे विचार करतो का? मुलांच्या मनात गोंधळ उडालेला असू शकतो. त्यांच्या मनात येते- मी काय करू नेमके? ...किशोरांशी मनोमन संवाद साधणारा हा संपादकीय लेख वाचा. संपादकीय ( मार्च २०१९) ‘वयम्’ मित्रांनो, काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर जो दहशतवादी हल्ला झाला, त्यामुळे सर्व भारतीयांना खूप दु:ख झाले. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा निषेध, संताप व्यक्त करू लागला. कुणी शांतपणे श्रद्धांजली वाहिली त्या हुतात्म्यांना. काहीजण मोटारबाईकवरून घोषणा देत फिरले. कुणी रेल्वेगाड्या बंद पाडल्या. कुणी रस्ते अडवले. कुणी फेसबुक, व्हॉटस्अॅपवरून मनाला येतील तशा सूचना करत सुटले. ज्यांना स्वत:ला काही समजले नाही किंवा सुचले नाही, ते इतरांची वाक्ये पुढे फॉरवर्ड करत बसले. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
मनातले चांदणे
वयम्
शुभदा चौकर
2019-03-01 15:30:21