कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग


आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल.   विराट कोहली तर सगळ्यांना व्हायला आवडेल, पण तशी इच्छा असणं आणि खरोखर विराटसारखा खेळाडू घडणं या दोन्हींत खूप फरक असतो ना? शाळेत असताना एअरफोर्स किंवा मिलिटरीमध्ये जावं असं अनेकांना वाटत असतं. अर्थात मलासुद्धा! पण जसजसा वरच्या इयत्तांमध्ये जाऊ लागलो तसतसं मला लक्षात येऊ लागलं की, मिलिटरीसाठी आवश्यक असलेला फिटनेस, उंची, व्यायामाची आवड इत्यादींचा माझ्यात अभाव आहे. यथावकाश ती इच्छा मागे पडली. कॉलेजमध्ये पहिल्या एक-दोन वर्षांतच आपला स्वत:चा व्यवसाय असावा, ही महत्त्वाकांक्षा माझ्यात निर्माण झाली. आपल्या आवडीचं काम आपल्या पद्धतीने करता यावं, कुणाचं बॉसिंग असू नये, नवनवीन लोकांशी संबंध येत राहावा, आपलं कार्यकौशल्य हीच आपली ओळख असावी, याप्रकारचं दृश्य डोळ्यांसमोर तरळत असे. मी शिकत होतो ते 'इन्स्ट्रुमेंटेशन’ या इंजिनिअरिंगच्या शाखेत; पण मला त्या विषयात फारसा रस नव्हता. एक आवड म्हणून कॉम्प्युटर हार्डवेअरचा वर्षभराचा कोर्स मी केला. तो कोर्स मला भावला. ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं त्यावेळी डोक्यात बिझनेसच्या कल्पनेने चांगलंच गारुड केलं होतं. आमचं 'इन्स्ट्रुमेंटेशन’ हे क्षेत्र असं आहे की, ज्यात किमान पाच-सात वर्षांचा नोकरीचा अनुभव असल्याखेरीज बिझनेस करणं जवळपास अशक्य. मग मला तीन वर्षांपूर्वी केलेल्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , करिअर

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen