आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. जाणून घेऊया सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दल- माझ्या बारा वर्षांच्या मुलाशी म्हणजे स्नेहशी बोलताना, त्याने म्हटले- “बाबा, मी पण आत्ता तुझ्यासारखे इंजिनिअर व्हायचे ठरवले आहे. म्हणजे कसे आहे ना, मी जॉब करायला लागलो की, तू मला टिप्स देत राहशील आणि माझे काम सोप्पे होऊन जाईल.’’ मी त्याच्याएवढा होतो तेव्हा, असली भारी कल्पना मला सुचलीच नव्हती. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकलो. आमच्या गावाच्या आसपास कारखाने, उद्योगधंदे अजिबातच नव्हते. त्यामुळे मोठे झाल्यावर काय व्हावे? तर शिक्षक, कंडक्टर, वकील, इन्स्पेक्टर व डॉक्टर एवढेच पर्याय मला सुचायचे. मी आठवीत असताना आमच्या शाळेत पहिल्यांदा कॉम्प्युटर आला. आम्हांला पंधरा दिवसातून एकदा कॉम्प्युटर हाताळायला मिळायचा. त्याचा तो कीबोर्ड, माउस, स्क्रीन बघून मी सॉलिड इम्प्रेस झालो. त्या कॉम्प्युटरचे पॉवरचे बटन मी आयुष्यात पहिल्यांदा दाबले, तो ‘कुईई’ असा आवाज होऊन त्या स्क्रीनवर आपोआप भराभर आपोआप पुढे सरकत जाणारी ती जादुई अक्षरे पाहिली. तेव्हाच मी मोठे झाल्यावर आपण कॉम्प्युटरच्या क्षेत्रातच काम करायचे हे पक्के केले. कॉम्प्युटरच्या क्षेत्रात नोकरी करायची असेल तर अकरावीत विज्ञान शाखा व गणित हे विषय घेतले पाहिजेत हे समजले. ते विषय घेऊन बारावी झाले की, इंजिनिअरिंगला प्रवेश घेता ये ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .