विजेचे ऊर्जादायी क्षेत्र

वयम्    सुनिता तांबे    2019-03-13 10:00:45   

आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. या भागात वाचा विद्युत अभियंता (इलेक्ट्रिकल इंजिनियर) नेमके काय काम करतो ते! आकाशात गडगडाट होऊन एक चमकदार चंदेरी वेडीवाकडी लखलखीत रेष तुम्हांला दिसते आणि पाठोपाठ प्रचंड मोठा आवाज येतो. तेव्हा तुम्ही म्हणता कुठेतरी वीज पडली. ही वीज म्हणजेच विद्युल्लता... आकाश आणि जमीन यांच्यामधील इलेक्ट्रिकल शक्तीचा आविष्कार. विद्युतशक्ती किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी हा अत्यंत महत्त्वाचा आणि विविध क्षेत्रांत उपयोगी पडणारा ऊर्जेचा स्त्रोत आहे. ऊर्जेची सतत मागणी असलेल्या या विद्युत शाखेत तुम्ही विद्युत अभियंता (इलेक्ट्रिकल इंजिनियर) म्हणून कसे आणि काय काम करू शकाल, याची थोडक्यात माहिती मी देते, कारण हा विषय मोठा तर आहेच, शिवाय तुम्हांला सांगताना मला अनेक तांत्रिक संज्ञांचा वापर करावा लागेल. अभियंता म्हटले की, ते शिकण्यासाठी शास्त्र, गणित आणि जोडीला Drawing हे विषय चांगले असणे गरजचे असते. दहावी झाल्यानंतर बारावी शास्त्र शाखा घेऊन उत्तीर्ण झाल्यावर इतर अनेक अभियांत्रिकी पर्यायांमधला एक पर्याय असलेल्या इलेक्ट्रिकल शाखेची निवड तुम्ही करू शकता. यामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असतो, तसेच तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रमदेखील उपलब्ध असतो. पदविका तुम्ही दहावी करूनही करू शकता, तेव्हा तुम्ही डिप्लोमा इंजिनिअर बनता. पदविका (डिप्लोमा) परीक्षा पास झाल्यानं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , करिअर

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen