आईचं अर्थशास्त्र!


कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्यांचे अर्थ आज जास्त नीटपणे समजताहेत!

सध्या बजेट, गुंतवणूक, कर भरणे हे शब्द आजूबाजूला ऐकू येत आहेत. या आर्थिक गोष्टींचा विचार करताना ४५ वर्षांपूर्वीचा माझ्या बालपणीचा काळ ताजातवाना होऊन डोळ्यांसमोर उभा राहतो. कोकणातील गुहागर-अडूरचे ते खेड्यातले रम्य दिवस आठवतात. या साऱ्या आठवणींतून उलगडत जातं ते आईचं अर्थशास्त्र!  कुटुंब मोठं असूनही किती नेटानं संसार केला तिने! किती कष्ट करायची आणि कशी बचत करायची ती! आज अर्थशास्त्राचा अभ्यास करताना त्या वेळचं आईचं अर्थशास्त्र किती साधं, सोपं होतं ते आठवतं आणि आश्चर्य वाटतं. बचत करावी, श्रम करायला लाजू नये आणि मोकûया वेळेचं रूपांतर पैशात करता येतं हे सगळं आम्हांला तिनेच शिकवलं. त्यावेळी गुहागरात वीज नव्हतीच. अडूरसारख्या खेड्यात तर ती पोहोचण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार होती. खेड्यातली सायंकाळ मन कातर करणाऱ्या भीतीच्या सावल्या सोबत घेऊनच यायची. गावभर हुंदडणारी आम्ही मुलं दिवेलागण होताच घरी परतत असू. हातपाय धुऊन 'शुभंकरोती’ म्हणण्यासाठी सर्वांनी तिन्हीसांजेला घरी असायलाच हवं, असा दंडक होता. घरात दिवे लावण्याची प्रत्येकाची पाळी ठरलेली असे. त्याने बिनबोभाटपणे काम पूर्ण करायचं. मागीलदारी आईने भाताची तुसं जाळून गोल ढीग केलेला असे. त्याच्या वरच्या थरातली शुभ्र रांगोळी अलगद डब्यात भर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , अर्थकारण , अनुभव कथन , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen