हा लेख आहे, काही मुलांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगणारा! मालवणची काही मुलं 'डॉल्फिन क्लब’ चालवतात; तर इंडोनेशियामधील बालीच्या दोन मुलींनी समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले... वाचा तर; आणि तुमच्या प्रयत्नांची अशी काही गोष्ट असेल तर आम्हांला कळवा..
मी तुम्हांला दोन गोष्टी सांगणार आहे. एक गोष्ट आहे प्लॅस्टिकच्या प्रदूषणाविरुद्ध लढणाऱ्या तुमच्याच वयाच्या बालीच्या दोन मुलींची. दुसरी गोष्ट आहे, अवघ्या जगासमोर पर्यावरण रक्षणावर धिटाईने भाषण देणाऱ्या स्वीडनच्या ग्रेटाची. तिसरी गोष्ट आहे, समुद्राशी नातं जोडणाऱ्या मालवणच्या मुलांची. मालवणच्या समुद्री जीवनावर माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवायचा असं मी ठरवलं आणि तो वेगळा कसा करता येईल यावर विचार करायला लागले. याचवेळी मला भेटली मालवणच्या टोपीवाला हायस्कूलची मुलं. मला खात्री होती, ही मुलं मालवणची आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या समुद्राबद्दल सगळ्यात जास्त माहिती असणार... त्यांच्या शाळेतल्या पर्यावरण शिकवणाऱ्या सरांनी मला सातवीच्या वर्गात नेलं, तेव्हा हे पटलंच मला. घननीळ सागराचा घननाद येत कानी घुमती दिशांदिशांत लहरींमधील गाणी मुलांनी मला त्यांच्या मराठीच्या पुस्तकातली कविता ऐकवली आणि मला पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटलं. काही मुलांनी समुद्राची चित्रं काढली, विनायकने समुद्रावर 'धूम मचा ले...’च्या चालीत गाणं रचलं, अनिकेतने डॉल्फिनचा धडा वाचून दाखवला, न ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .