बर्फाचे वाळवंट


अंटार्क्टिका म्हणजे जणू बर्फाचे वाळवंटच! बहुतांश भागात झाडाझुडपांचा अभावच. या उजाड, ओसाड खंडावर प्राणवायू ठासून भरला आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा! भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. एकेकाळी म्हणजे सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिका, भारत, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मिळून एकच भूभाग होता, ज्याचे नाव होते 'गोंडवन’! अंटार्क्टिका आणि गोंडवन-मध्यप्रदेश येथे आढळून येणारे जीवाष्म मिळते-जुळते आहेत. कालांतराने हे  सगळे खंड एकमेकांपासून वेगळे होऊन दूर गेले आणि अंटार्क्टिका चहूबाजूंनी दक्षिण महासागराने वेढला गेला! [caption id="attachment_9494" align="alignright" width="300"] Ice Cave[/caption] भूतकाळात अंटार्क्टिकात झालेल्या ज्वालामुखी विस्फोटांचे अनेक पुरावे सापडले आहेत. परंतु आज मात्र अंटार्क्टिकात एकच जिवंत ज्वालामुखी आहे. याचे नाव माऊंट एरेबस (Mount Erabus) असे आहे. आजही त्यातून वितळलेला लाव्हारस निघतो. ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे दृश्य मोठे विहंगम दिसते! माऊंट एरेबसच्या मुखातून लाव्हासह अतिशय उष्ण वायू आणि वाफ  उत्सर्जित केली जाते. गमतीची गोष्ट म्हणजे वरती उसळलेली ही वाफ अंटार्क्टिकाच्या अतिशीत तापमानामुळे लगेचच बर्फात रूपांतरित होते. त्यामुळे आकाशाच्या दिशेने उसळणारा आणि त्यानंतर एकमेकांच्या साथीने खाल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , अनुभव कथन , बालसाहित्य , स्थल विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen