ड्रायक्लिनिंग!


कपड्याचा रंग धुतला जाऊन तो पसरू नये म्हणून काही कपड्यांचे ड्रायक्लिनिंग केले जाते. या प्रक्रियेचा शोध कसा लागला माहितीये?

शनिवारी मस्त सुट्टीची मजा घेत पुस्तक वाचत बसलेला आठवीतला ईशान, आईच्या हातातला धुण्याच्या कपड्यांचा गठ्ठा बघून म्हणाला, ''आई, तो लाल टी शर्ट धुवायला टाकू नको. त्याला ड्रायक्लिन करायला दे. त्याच्यावर तसं लिहिलं आहे.’’ आईला गंमत वाटली. ती मुद्दाम ईशानला म्हणाली, ''एकदम आज कसं काय हे तुझ्या लक्षात आलं बुवा?’’ तेव्हा आपले डोळे चमकवत ईशान म्हणाला, ''अगं बस इथे. तुला मी गंमत सांगतो. मी एका माणसाची गोष्ट वाचली. ऐक तू पण.’’ आई उत्सुकतेने म्हणाली, ''हं सांग!’’ [caption id="attachment_9511" align="alignright" width="120"] Professional clearing symbol[/caption] ''बघ ही गोष्ट पार १८२१ ते ५५ च्या काळातील आहे. जीन बाप्तीस्त जॉली नावाचा एक फ्रेंच टेलर होता. म्हणजे खरं तर तो कपड्यांना डाय करून म्हणजे रंग लावून देण्याचे काम करायचा. त्यांच्या घरी एक खूप सुंदर टेबलक्लॉथ होता. तो टेबलक्लॉथ त्याच्या बायकोचा फारच लाडका होता. ते फार काळजी घ्यायचे त्याची. पण एका आठवड्यात कामाच्या धबडग्यात तो धुवायचा राहून गेला, तसाच टीपॉयवर मळलेला टेबलक्लॉथ अंथरला होता. रोजच्यासारखी त्यांची कामवाली बाई आली आणि साफसफाई करायला लागली. त्याकाळी टरपेन्टाईनवर पेटणारे दिवे होते, हे तुला माहीत असेलच?’’ ईशान आता मोठा होऊन 'छोट्या' आईला गोष्ट सांगत होता. 'हो हो’ आईने पण शहाण्या विद्यार्थिनीसारखी मान हलवत म्हटल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen