दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक करा, तमुक करा असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखी एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून समजावून घेऊया. ही संकल्पना आहे GST (Goods and Service Tax) GST अर्थात वस्तू आणि सेवा कर! आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन बालमैत्रिणी, राधा आणि तिच्याच शेजारी राहणारी तिची वर्गमैत्रीण सारा! राधाचा वाढदिवस उद्यावर आल्याने, तिच्यासाठी बाबांनी, शाळेत वाटण्यासाठी चॉकलेटचा डबा घरात आणून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाची स्वारी तयार होऊन शाळेत निघाली. बाहेर आल्यावर सारा आणि तिच्या आईने राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मग राधाने त्या दोघींना एक-एक चॉकलेट काढून दिले. दोघी शाळेच्या व्हॅनमध्ये बसून शाळेच्या गेटवर पोहोचल्या. गेटवर उभ्या असलेल्या वॉचमनकाकांनी, राधाच्या हातातील चॉकलेटचा डबा पाहिला आणि तिचा वाढदिवस असेल असे समजून त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. राधाने त्यांनाही चॉकलेट दिले. मग राधा आणि सारा वर्गात आल्या. राधाने सगळ्यांना चॉकलेटं वाटली. वर्गात असलेल्या साराला पुन्हा चॉकलेट मिळाले म्हणून ती खूप खूश झाली. मित्रांनो, आता असे समजा की, वाढदिवस म्हणजे तुमचा व्यवसाय आणि चॉकलेट म्हणजे त्यावर द्यावा लागणारा कर! शेजारीच राहणाऱ्या सारा आणि तिच्या आईला चॉकलेट स्वरूपात जो मिळाला तो झाला स्थानिक कर (लोकल टॅक्स) आणि गेटवरच्या वॉचमनकाकांना जो मिळाला तो झाला प्रवेश कर (एन्ट्री टॅक्स)! वर्गातील सर्व मुलांना जो मिळाला त्याला म्हणूयात सेवा कर (सर्व्हीस टॅक्स) आणि साराला दुसऱ्यांदा मिळालेले चॉकलेट हा झाला अतिरिक्त कर (सरचार्ज)! एकाच वस्तूवरच्या, अशा सगळ्या वेगवे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .