लिट्ल मिस सनशाईन

वयम्    गणेश मतकरी    2019-03-28 10:47:34   

सध्या टीव्हीवरच्या विविध 'रिअॅलिटी शो’मध्ये लहान मुलांच्या स्पर्धा दाखवल्या जातात. त्यात रमताना, स्पर्धा आणि स्वीकार यांच्याबद्दल स्वत:चा दृष्टिकोन ठरवायला मदत होईल, असा हा चित्रपट कुटुंबातील सर्वांनी नक्की बघा. आपल्याकडे जेव्हा टीव्हीचे वेगवेगळे चॅनल्स यायला लागले, तेव्हा रिअॅलिटी टीव्ही नावाच्या एका प्रकाराचं पेव फुटलं. आता यात काही फार आश्चर्य नाही, कारण जेव्हा टेलिव्हिजनवर सतत दाखवण्यासाठी अनेक कार्यक्रमांची आवश्यकता असते, तेव्हा सोप्या, स्वस्तात बनवता येणाऱ्या आणि चिकार प्रेक्षक मिळण्याची शक्यता असणाऱ्या कार्यक्रमाला मागणी येणार हे उघड आहे. या रिअॅलिटी टेलिव्हिजनचा एक महत्त्वाचा भाग होता, तो स्पर्धा.. नृत्य, गायन, अभिनय, अशा विविध क्षेत्रांशी संबंधित या स्पर्धांमधे एका बाबतीत साम्य होतं. ते म्हणजे यातल्या बहुतेकांमधले स्पर्धक हे सामान्य प्रेक्षक असत. आपल्यातलं कोणीही तिथे जाऊन आपले कलागुण दाखवायचे, आणि हे गुण जर खरोखर वाखाणण्यासारखे असतील, तर विजेतेही ठरायचे. खरंतर यात गैर काय, पण त्यातून प्रत्येकानेच आपण कोणीतरी विशेष आहोत असं समजायला सुरुवात केली! पालकांनी आपल्या मुलांमधे नसलेले कलागुणही पाहायला सुरुवात केली, आपल्यातले खरे गुण बाजूला ठेवत, केवळ टीव्हीवर चमकण्यासाठी आवश्यक ते गुणच महत्त्वाचे ठरायला लागले आणि या सगळ्यातून एक विचित्र स्पर्धा सुरू झाली. हे जे वातावरण तयार झालं ते किती नकली आहे, आणि आपण जसे आहोत तसेच असण्यात काहीच वाईट नाही असं सांगणारा सिनेमा म्हणजे २००७ साली आलेला 'लिटल मिस सनशाईन.’ याला पाश्र्वभूमी आहे ती एका लहान मुलींसाठी घेण्यात येणाऱ्या 'लिटल मिस सनशाईन’ या सौंदर्यस्पर्धेची. छोटी ऑलिव्ह (अॅबिगेल ब्रेस्लिन) या स्पर्धेत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. shripad

      5 वर्षांपूर्वी

    मराठीत "दे धक्का" या नावाने आलेला एक चित्रपट असाच होता साधारण.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen