अंक : अंतर्नाद : दिवाळी २०२० त्यांच्या कादंबऱ्यांतून मानवी जीवनाचे अतार्किक विभ्रम आपल्या अंगावर मारेकऱ्यांसारखे धावून येतात. गारठवून टाकतात. अंतर्मुख करतात. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर चौथी मूलभूत मानवी गरज म्हणजे 'हिरवा-निळा द्वेष' तर नसेल? हा प्रश्न सरदेशमुखांच्या कादंबऱ्या वाचून मला पडतो. हा हिरवा-निळा, काहीसा वेडसर भासणारा द्वेष त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचा जणू स्थायिभाव आहे. ****** डिसेंबर २००५ मध्ये त्र्यं. वि. सरदेशमुख गेले. बातमी अनपेक्षित नव्हती. म्हणजे तसं वय झालं होतं. त्यांना सन्माननीय मृत्यू आला. तो सगळ्यांनाच तसा येतो असं नाही, पण त्यांचा मृत्यू त्यांची आब राखून आला. मृत्यूपूर्वी काही तास अगोदरच त्यांनी आपल्या भावी लिखाणाची टाचणं काढल्याचं वाचलं. आपल्या विहित कर्मात शेवटच्या श्वासापर्यंत बुडालेला हा गंभीर प्रवृत्तीचा मराठी कादंबरीकार, अनुवादक आणि समीक्षक कधीही परतून न येण्यासाठी आपल्यातून निघून गेला,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .