अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
आर्त या नव्या कथासंग्रहातल्या 'श्रद्धा' आणि जन्म या आदिअंताच्या कथा मोनिका गजेंद्रगडकरच्या 'आर्त' कथासंग्रहात नव्हे तर एकूणच तिच्या आजवरच्या कथालेखनात उत्कर्षबिंदू ठराव्या अशा आहेत. सुरुवातीला 'साप्ताहिक सकाळ'च्या कथास्पर्धाच्या निमित्ताने सुरू झालेला मोनिकाचा कथाप्रवास आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहल्याचे या दोन कथा निदर्शक आहेत. गंमत म्हणजे अगदी सुरुवातीची, म्हणजे १९९६ सालची, साप्ताहिक सकाळमधली 'नातं' ही कथासुद्धा याच संग्रहात आहे. त्यामुळे मोनिकाचा एकंदर लेखनप्रवास इथे ठळकपणे समोर येतो. स्त्री लेखकल्या आधीच्या पिढीतल्या 'आयकॉन्स म्हणाच्या अशा गौरी, सानिया, कमल देसाई वगैरे लेखिकांच्या आणि मेघना, कविता वगैरे समकालीनांच्या वाटेहून निराळी आणि आपली स्वतः ची अशी वाद चोखाळणाऱ्या मोनिकाच्या कथाप्रवासाने इतर लेखिकांप्रमाणेच आपल्या पित्याच्याही (कै. विद्याधर पुंडलिक) कथालेखनाचा ठसा नाकारलेला दिसतो. माणसामाणसांतली नाती आणि त्यांतला संवाद, असंवाद आणि विसंवाद हा मोनिकाच्या कथाचा शोधविषय आहे. त्यात तर्ककर्कश वाद मात्र नाही आणि नात्यातले सुसंवादही क्वचितच आहेत. आहे तो अभिनिवेशनहीन कुतुहलाने घेतलेला असंवादाचा अन् विसंवादाचा शोध. तिच्या कथा रीतसर तिहाई वगैरे घेऊन सीमेवरच संपतात, तरी त्यात ढोबळ निर्णायकता नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .