मंत्रचळ- तुम्ही पाहिला आहे का ?


अक्षय जेवायला बसताना हात धुवून बसलेला असतो. पण जेवण येई पर्यंत दोन मिनीटात त्याचा हात टेबलाला लागतो,त्यामुळे हाताला जंतू लागले असतील असा विचार त्याच्या मनात येतो आणि तो पुन्हा हात धुवायला जातो. रोज असे तीन चार वेळा होऊ लागल्याने त्याच्या बायकोने डायनिंग टेबलवरच  हँड सॅनिटायझर ठेवायला सुरुवात केली आहे. अक्षयला आपले वागणे चुकीचे आहे हे कळते पण हाताला जंतू लागले असतील हा विचार त्याच्या मनात वारंवार येतो आणि तो विचार त्याला अस्वस्थ करतो. हात स्वच्छ करीत नाही, तोपर्यंत त्याला चैन पडत नाही. अक्षयच्या या वागण्याला सर्वजण मंत्रचळ म्हणतात. मानसशास्त्रात याला अॉब्सेसिव कम्पल्सिव डिसअॉर्डर म्हणतात. हा एक प्रकारचा चिंतारोग आहे. असा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या मनात एखादा त्रासदायक विचार पुनःपुन्हा येत राहतो आणि त्या विचारानुसार कृती होत नाही तोपर्यंत तिला अस्वस्थ वाटत राहते. ती कृती केली की अस्वस्थता काही काल कमी होते. पण पुन्हा थोड्याच वेळात तो विचार डोके वर काढतो. असा एकच विचार पुन्हापुन्हा येण्याची त्या व्यक्तीला जणूकाही सवयच लागून जाते. तुम्ही तुमच्या कुटुंबात किंवा मित्र मंडळीत असा एखादा मंत्रचळ असलेला माणूस पाहिलेला असू शकतो. तसे आपण सर्वच जण थोडेसे मंत्रचळी असतो. आपण दाराला कुलूप लावतो आणि चालायला लागतो पण चार पावले गेल्यानंतर आपल्या मनात शंका येते की कुलूप नीट लागले आहे की नाही. आपण परत येऊन कुलूप ओढून पाहतो.असे एकदा झाले तर ठीक आहे पण हा त्रास असलेली व्यक्ती चारचार वेळा पुन्हापुन्हा येऊन कुलूप ओढून पाहते त्यावेळी त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परीणाम होऊ लागतात. विचारामुळे येणारी अस्वस्थता हे या त्रासाचे मुख्य लक्षण असते.कुलूप नीट लागलेले नाही, त्यामुळे चोरी होईल  हा विचार

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , मनसंवाद

प्रतिक्रिया

  1. Purnanand Rajadhyakshya

      2 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती

  2. Ketaki Kulkarni

      3 वर्षांपूर्वी

    उपयुक्त माहिती 👍🏻

  3. Shalini Wagh

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय माहितीपूर्ण लेख 👌👌👌

  4. raju.khandalkar

      7 वर्षांपूर्वी

    खूपच अप्रतिम लेख। अतिशय सुरेख मांडणी



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen