अमित मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी रोज सराव करतो. रोज दोन तास तो पळतो. काल असाच सराव करताना त्याच्या पायाला जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागले पण अमितला त्याचे भान नव्हते. त्याने त्याचा सराव पूर्ण केला आणि नंतर त्याला जाणवले कि पाय दुखतो आहे. पायातून रक्त येते आहे. अमित पळत असताना त्याला झालेली जखम जाणवली नाही, कोणत्याही कृतीचा आनंद घेत असताना माणसाला वेदना जाणवत नाहीत, त्यांची तीव्रता कमी होते. असे का होते? गौरव ठाण्यात आला की मामलेदार मिसळ खाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. खरं म्हणजे झणझणीत,तिखट जाळ मिसळ खाल्ली की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्रास होतो. तरीदेखील मिसळ खाण्याचा मोह त्याला होतोच,असे का होते? कोणतेही टेन्शन आले की शिवानी डार्क चॉकलेट खाते. प्रेझेंटेशनच्या आधी ते खाल्ले की तिला बरे वाटते, टेन्शन मुळे वाढणारी डोकेदुखी चॉकलेट खाल्ल्यावर कमी होते असा तिचा अनुभव आहे. असे का होते? हे तीन प्रश्न वेगवेगळे असले तरी त्याचे उत्तर एकच आहे. या तीनही प्रश्नांचे उत्तर मेंदूतील एनडोर्फीन नावाच्या रसायनात आहे. मेंदूत कोणत्याही दोन पेशी परस्परांना जोडलेल्या नसतात. एका पेशीत आलेला विद्युत संदेश पुढील पेशीत पोचण्यासाठी दोन पेशीच्या मध्ये रसायने पाझरतात .त्यांनाच न्युरोट्रान्समिटर्स म्हणतात. मराठीत त्यांना संदेशवाहक म्हणता येईल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच माहिती पूर्ण लेख - आवडला आणि आपल्या अनेक कृत्यांचा उलगडा होऊ लागला आहे .
yash
7 वर्षांपूर्वीi tjink very good and valuable information i look forward such next information Thanks.
arya
7 वर्षांपूर्वीनवीनच माहिती मिळाली. चांगला लेख आहे
prasadkanegaonkar
7 वर्षांपूर्वीBest
AMKHADILKAR
7 वर्षांपूर्वीउत्तम माहितीप्रद लेख. Obsessive compulsive disorder बद्दल असाच माहिती पूर्ण लेख लिहावा ही विनंती.
Nishikant
7 वर्षांपूर्वीशाब्बास वेलणकर!
sdmulye
7 वर्षांपूर्वीअतिशय उत्तम, माहितीपूर्ण, सर्वांगसुंदर लेख.......