नाते प्रेमाचे शरीर स्पर्शाचे


लेखक: डॉ यश वेलणकर मेधा अस्वस्थ असते,बेचैन असते त्यावेळी तिची एक खास मैत्रीण आहे तिला भेटते.दोघी एकमेकींचा हात हातात घेऊन खूप गप्पा मारतात,कधीतरी एकत्र चालायला जातात.असे केले की तिची अस्वस्थता कमी होते.ती पुन्हा रोजच्या आव्हानांना तोंड द्यायला तयार होते. कौतुकला मुलांची फार आवड नव्हती पण त्याचे लग्न झाले,नंतर त्याला मुलगी झाली.ती छोटी वल्लरी रांगत येऊन त्याला बिलगते त्यावेळी कौतुक आनंदाने मोहरून जातो. मैत्रिणीला भेटल्यानंतर मेधाचा  मानसिक तणाव कमी होतो  किंवा कौतुकला वात्सल्याचा अनुभव येतो त्यावेळी त्यांच्या मेंदूत आणि शरीरातही ओक्सिटोसीन नावाचे रसायन पाझरत असते. काय आहे या रसायनाचे काम? मानवी शरीरातील या रसायनाचा शोध १९०६ सालीच लागला आहे.स्त्रीला प्रसववेदना सुरु होतात त्यावेळी हे रसायन वाढलेले असते असे प्रथम लक्षात आले.बाळ स्तनपान करीत असते त्यावेळीही हे रसायन मातेच्या शरीरात तयार होत असते हे १९११ साली समजले.१९५० च्या आसपास हे रसायन औषध म्हणून तयार करता आले आणि गेली सत्तर वर्षे हेच औषध प्रसुती लांबली असेल तर कळा येण्याचे  इंजेक्शन म्हणून दिले जाते.या शोधासाठी Du Vigneaud डू व्हीग्नोड यांना १९५५ साली नोबेल पारितोषिक मिळाले.पण त्यावेळी त्या रसायनाचे मेंदूतील काम लक्षात आलेले नव्हते

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यश वेलणकर , मेंदूविज्ञान

प्रतिक्रिया

  1. maneeshanarkar

      7 वर्षांपूर्वी

    Scientific fact in apealing words

  2. arya

      7 वर्षांपूर्वी

    स्पर्शाची एक भाषा असते. त्यामागील विज्ञान समजले.

  3. Vishal1111

      7 वर्षांपूर्वी

    मानवी जीवनात असलेले परस्पर संबंधांचे सद्भवनांचे महत्व खुप छान...स्पष्ट केले आहे.

  4. prashasnt

      7 वर्षांपूर्वी

    Very good article & well explained about brain chemical oxytocin. This article cleared what is reason of stress & underlined the importance of sharing the feelings. Thanks!

  5. VirenSule

      7 वर्षांपूर्वी

    Not able to type in Marathi in this window. My complaint is about this article Nate Premache Sharir Sparshache by Yash Velankar. I am being denied reading this article although I am a member of Punascha. Virendra Sule

  6. ambarishk

      7 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख! आजकाल गाईनी अधिक दूध देण्यासाठी त्यांना ऑक्सिटोसिन ची इंजेक्शन्स टोचतात असे ऐकले आहे. ते ऑक्सिटोसिन दूध पिणाऱ्याच्या पोटात जाऊन काय दुष्परिणाम संभवतात?

  7. Nishikant

      7 वर्षांपूर्वी

    डॉक्टर, उत्तम माहिती. आभार.

  8. sejal@123

      7 वर्षांपूर्वी

    lekh chan vatala

  9. Dashlesha

      7 वर्षांपूर्वी

    वाह, विभक्त कुटुंब आणि मोबाईल वापराबद्दल किती समर्पक लिहिलंय, अगदी पटलं

  10. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    स्वतःकडून कळत नकळत होणार्या छोट्या छोट्या चुकांमुळे स्ट्रेस येत असेल व आत्मविश्वास कमी होत असेल तर मेंदूमधल्या कुठल्या रसायनाचा यात वाटा असतो? छान महत्वपूर्ण माहिती!

  11. Devendra

      7 वर्षांपूर्वी

    लेख माहितीपुर्ण आहे, पण त्रोटक वाटला, ऑक्सिटोसिंनचे औषध मूल्य निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास कितपत उपयुक्त आहे

  12. mahendranene

      7 वर्षांपूर्वी

    लेख माहितीपूर्ण वाटला व आवडला



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen