लेखक: डॉ यश वेलणकर दुसऱ्या दिवशी प्रवासाला जायचे असले की रात्री सुरेशला झोप लागत नाही.प्रवास नीट होईल ना, काही अडचण येणार नाही ना ,गाडी वेळेवर येईल ना असे असंख्य विचार त्याला झोपू देत नाहीत,त्याची रात्र कुरतडून काढतात.त्याच्या रोजच्या ठरलेल्या दिनक्रमात कोणताही बदल होणार असला की त्याला तणाव येतो सुनीलला प्रवासाची अस्वस्थता येत नाही,कारण व्यवसायासाठी त्याला बराच प्रवास करावा लागतो.पण कुणीही पाहुणे येणार असतील की तो अस्वस्थ होतो.ते कसे येणार,कसे जाणार,किती दिवस राहणार,त्यांना कसे,कोठे फिरवायचे, याचेच विचार भून्ग्यासारखे पुनःपुन्हा त्याच्या मनात येतात,त्याचा पिच्छा सोडत नाहीत.लोक आपल्याला काय म्हणतील,नावे ठेवतील का याचीच चिंता त्याला लागून राहिलेली असते. नीताला सतत घराची स्वच्छता आणि घरातील कामे यांचीच काळजी लागलेली असते.त्यातून तिचा नवरा आणि मुलगा ,अगदी बेशिस्त,ते बाहेरून आल्यानंतर त्यांची चप्पलहि नीट ठेवणार नाहीत,त्यामुळे नीताचा नुसता तिळपापड होतो.तिला घरात बेशिस्त अजिबात खपत नाही त्यामुळे सर्वाना शिस्त लावून प्रत्येक वस्तू जागच्याजागी स्वच्छ करून ठेवताना ती थकून जाते. तिघांनाही वयाच्या चाळीशीतच मानसिक तणावामुळे होणारे आजार झाले आहेत.नीताचे थायरॉइड बिघडले आहे,सुनीलला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गोळी घ्यावी लागते तर सुरेशला मधुमेहाचा त्रास सुरु झाला आहे.खर म्हणजे या तिघांच्याही आजाराचे मूळ कारण त्यांच्या स्वभावात आहे.पण त्याची त्यांना कल्पना नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीअसेच वाचत रहावे असे वाटतेय.
Monika
7 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण लेख. स्वभावाला औषध शोधता येईल का ?
Sanjaymanisha
7 वर्षांपूर्वीYa ajaravar ajun kahi likhan aslyas share karave..khup chhan ani sarvana upayogi
TINGDU
7 वर्षांपूर्वीह्या विषयावर पुढचे लेख वाचल्यावर अभिप्राय देता येईल.
raju.khandalkar
7 वर्षांपूर्वीयश वेलनकर यांच्या लेखांचा मी fan झालो आहे, है अतिशय उपयुक्त शिक्षन आहे. माइंडफुलनेस बद्दल वाचून आनंद झाला
shubhadabodas
7 वर्षांपूर्वीहया लेख वाचण्यासाठी वेगळे सभासदत्व आहे का?
ambarishk
7 वर्षांपूर्वीAtishay uttam lekh! Maza mansik tanav vadhla ki mala mouth ulcers ka yetat tyache uttar milale. Mi swataha TM tasech sahaj yog hya dhyan paddhati cha vapar karto aahe va tyane maza manasik tanav barach kami zala tasech mouth ulcer cha tras hi javal javal band zala aahe. Aapli prachin bhartiya sanskruti va dnyan kiti maulik aahe tyachi khatri patli.
Nishikant
7 वर्षांपूर्वीवेलणकर, लेख माहितीपूर्ण अन वाचनीय झालाय. चालु द्या.
Vishal1111
7 वर्षांपूर्वीHa lekh kasa wachawa
SachinKetkar
7 वर्षांपूर्वीलेख इंटरेस्टिंग पण त्रोटक आहे. अजुनी तपशिलात येऊ द्या
Dravimagare
7 वर्षांपूर्वीअतिशय उत्तान लेख, लेखकाने transcendental meditation वर अधिक प्रकाश टाकला तर बरे होईल, लेखावरून वाटते की स्वभावाला औषध आहे.