आघातोत्तर तणाव


लेखक: डॉ यश वेलणकर सीमा एक स्मार्ट,हुशार इंजिनिअर तरुणी. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तिला लगेच नोकरी मिळाली. कॉलेजमध्ये असताना कँपस इंटरव्ह्यू मध्येच तिची निवड झाली होती. कॉलेज मध्ये ती तिची मोपेड घेऊन जायची तशीच नोकरीला देखील जाऊ लागली. पण चार महिन्यापूर्वी ती तिची मोपेड चालवत असताना तिच्या समोर एक भीषण अपघात झाला. चौकात मोपेड वरील एका तरुणाला भरधाव ट्रकने उडवले. तिच्या समोर तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता. ते दृश्य सीमाने पाहिले. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेलीच नाही. नंतर काही दिवस रिक्षाने ऑफिसला गेली.आता या घटनेला चार महिने झाले तरीदेखील तिला तिची मोपेड चालवत रस्त्यावर जाण्याची भीती वाटते. रात्री झोपेतून ती दचकून जागी होते. असे अपघात काही रोज होत नाहीत असे तिने तिच्या मनाला समजावले तरी मोपेड चालवण्याच्या कल्पनेनेच तिच्या छातीत धडधडू लागते. ती अतिशय अस्वस्थ होते. नोकरीला रोज रिक्षाने जाणे परवडत नाही, त्यामुळे ती नोकरी सोडण्याचा विचार करू लागली. तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पण औषधे घेऊनही फारसा फरक पडला नाही.असे काय झाले आहे सीमाला आणि त्यावर काही उपाय आहे की नाही   सीमाला जो त्रास होतो आहे त्याला आघातोत्तर तणाव PTSD post traumatic stress disorder असे नाव आहे.समोर भयानक अपघात पाहिल्याने तिच्या मनावर जो आघात झाला त्यामुळे तिला त्रास होतो आहे. गेल्या लेखात आपण भावनांना तोंड देण्याचा तिसरा मार्ग पाहिला होता. राग,चिंता,नैराश्य,अस्वस्थता,भीती या भावना मानसिक तणाव वाढवतात ,त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात. ते कमी करायचे असतील तर मनात यातील कोणतीही भावना आली की आपले लक्ष शरीरावर आणायचे, भावनां

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यश वेलणकर , मेंदूविज्ञान

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती .

  2. rsrajurkar

      6 वर्षांपूर्वी

    Chaan mahiti

  3. rsrajurkar

      6 वर्षांपूर्वी

    ?

  4. sharadnaik

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान माहितीपूर्ण लेख, अगदी सोप्या भाषेत. मंइंडफुलनेसचा उपयोग दैनंदिन ताणतणाव घालवण्यासही करता येईल का?

  5. Rajrashmi

      7 वर्षांपूर्वी

    मानवी शरीर पुर्णपणे वेगवेगळ्या स्त्रावांवर चालले, ह्या लेखामुळे काही स्त्राव नियंत्रित करतात येतात हे समझले, बाँडी स्कॅन चा फायदा नक्कीच होईल, उत्तम लेख, मी वाचत असलेल्या मनात या पुस्तकासाठी मला फार ऊपयोगी वाटला। धन्यवाद!!!!!

  6. arush

      7 वर्षांपूर्वी

    उत्तम उपाय आहे स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा. पण मग रस्त्यावरच्या accident कडे थंड भावनेने बघणार्यांचा अमायग्डला नक्की काय काम करत असतो?

  7. vidyakale

      7 वर्षांपूर्वी

    Khoop sundar ani mahitipurna lekh

  8. vidyakale

      7 वर्षांपूर्वी

    Uttam lekh...itkya sankalpana sarvanna samahel ashya soppya bhashet sangitlya aahet.. khoop sundar ani mahitipurna ??

  9. maheshbapat63

      7 वर्षांपूर्वी

    आजच्या कालानुरूप आणि आवश्यक। ज्ञान वर्धक।

  10. Ani

      7 वर्षांपूर्वी

    Khup sundar

  11. nstekale

      7 वर्षांपूर्वी

    Its a scientific article written in simple lucid manner.The concept of mindful body scan is new in our country and it require in depth awareness programme.There are many more victims like Sema in our society needs proper education to the brain. The emotional quotient is linked with emotional hijack,yes its very true.I personally feel very sorry when we see many young generation youth instead of helping the victims laying in pool of blood,busy in taking the photographs and videos. These people are not at all afraid of situation in front of them . Is something wrong in their Prefrontal Cortex? Do they also need a mindful body scan ? Research and full length article is needed on this.I personally appreciate the content of this article.Congratulation for Punashya sharing this on your platform.Keep it up.

  12. ambarishk

      7 वर्षांपूर्वी

    Nehemipramanech uttam lekh! Mindfullness chi sankalpana aani tyache sakaratmak parinam sopya bhashet ulgadun sangitlyabaddal dhanyavaad!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen