अलका काकूंना निद्रानाश आहे. अंथरुणावर पडून त्या तासनतास झोपेची आराधना करीत राहतात पण निद्रादेवी प्रसन्न होत नाही. झोपेच्या गोळ्यांची सवय लागते म्हणून त्या गोळी घेण्याचेही टाळतात. रात्री झोप लागत नाही, त्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटत नाही, दिवसभर जांभया येत राहतात. हा निद्रानाश कशाने कमी होईल असा प्रश्न त्यांना पडला आहे. संदीपला झोपेत बोलण्याची सवय आहे, काहीवेळा तो झोपेत हातवारेदेखील करतो. त्याचे झोपेतील वर्तन इतरांच्या चेष्टेचा विषय आहे. तो झोपेत काय करतो ते त्याला जागे झाल्यानंतर आठवत नाही. झोपेत माणसे का बोलतात या प्रश्नाचे उत्तर तो शोधतो आहे. निशा एके दिवशी सकाळी जागी झाली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला कोणतीच हालचाल करता येईना. कुशीवर देखील वळता येईना. ती खूप घाबरली आणि हाका मारण्याचा प्रयत्न करू लागली. पण तोंडातून आवाजही फुटेना. शेवटी ती तशीच पडून राहिली आणि पाच मिनिटांनी तिला हालचाल करता येऊ लागली. नंतर ती रोजच्यासारखी उठून चालू लागली. पाच मिनिटापूर्वी आपल्याला नक्की काय झाले होते हेच तिला समजेनासे झाले आहे. झोप हा आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहे. आपले एकतृतीयांश आयुष्य झोपेत जात असते. लहान बाळ दिवसातले अठरा तास झोपते, वय वाढते तसे झोपेचा कालावधी कमीकमी होत जातो. झोप ही तशी अतार्किक गोष्ट आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
purnanand
7 वर्षांपूर्वीJitugholap
7 वर्षांपूर्वीखूप सुंदर
sureshjohari
7 वर्षांपूर्वीअत्यंत माहितीपूर्ण लेख . धन्यवाद
shrikantkekre
7 वर्षांपूर्वीshailesh71
7 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण व वाचनीय लेख!
shailesh71
7 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण !
arya
7 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण व उपयुक्त लेख
RAjkuvar Deshmukh
7 वर्षांपूर्वीखूप सुंदर, माहितीपूर्ण लेख
jayashreehinge
7 वर्षांपूर्वीहा लेख खूपच आवडला.झोप येत नसेल तर नामस्मरण करत राहणे.याचाही फायदा होऊ शकतो.
Suchitabordekar
7 वर्षांपूर्वीऊपयुक्त माहिती
यश वेलणकर
7 वर्षांपूर्वीछान,तुम्ही करताय ते बरोबर आहे।श्वासाची नैसर्गिक हालचाल जाणत राहणे हा सजगता ध्यानाचा एक प्रकार आहे
ambarishk
7 वर्षांपूर्वी