एक दर्शन: अफगाणिस्तानचे


माझा मित्र जॉर्ज चिरा एकदा सहज बोलता बोलता म्हणाला की, ‘अफगाणिस्तानमधल्या एखाद्या प्रकल्पाचे मूल्यांकन (इव्हॅल्यूएशन) करायची वेळ आली तर तू ते करशील का?’ मी 'हो' म्हणालो आणि विसरून गेलो. मला वाटलं, जॉर्ज मस्करी करत असेल. कारण अफगाणिस्तान हा अत्यंत असुरक्षित देश. सुखासुखी तिथे कोणी जात नाही. तिथे जायची माझी तयारी आहे का ते तो नुसते चाचपून बघत असेल. जॉर्ज माझा फार जुना मित्र. तो दीर्घ काळ पुण्यामध्ये 'तेरे देस होम्स' या जर्मन संस्थेच्या दक्षिण आशियाई कार्यालयाचा प्रमुख होता. आता निवृत्त झाला असला तरी त्यांच्यासाठी सल्लागार म्हणून काम करत होता. मात्र एके दिवशी त्याने खरोखरच तसा प्रस्ताव आणला. तो म्हणाला की,  ‘अफगाणिस्तानमध्ये ‘जारएस’ नावाची संस्था तिथल्या निर्वासित मुलांसाठी एक प्रकल्प राबवत आहे. त्या प्रकल्पाचं मूल्यांकन त्यांना करायचं आहे. ह्या प्रकल्पाला जर्मन सरकार मदत करते. दहा-बारा दिवसांचे काम आहे. करतोस का?’

पूर्वी 'हो' म्हणून बसलो होतो. त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. तयारी केली. प्रकल्पाची सगळी माहिती त्यांनी पाठवली. त्याप्रमाणे मूल्यांकनाचा आराखडा तयार केला. मुख्य मुद्दा व्हिसा मिळवण्याचा होता. अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध चांगले असल्याने आपल्याला व्हिसा फी पडत नाही. पण तिथली परिस्थिती असुरक्षित असल्याने व्हिसा मिळायला अडचण येऊ शकते. मात्र 'जेआरएस'चे तिथल्या सरकारमध्ये वजन असल्याने ती समस्या आली नाही. दिल्लीत दोन दिवस थांबून व्हिसा घेतला आणि तिथूनच काबूलला गेलो. तारीख होती २६ डिसेंबर २०१९.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज दिवाळी अंक २०२० , स्थल विशेष , विश्ववेध

प्रतिक्रिया

  1. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    अफगाणिस्तानविषयी विस्तृत माहिती मिळाली , खूप छान

  2. Manasi Holehonnur

      4 वर्षांपूर्वी

    Its good to see some hope in Afghanistan.. Lovely memoir.

  3. Sadhana Anand

      4 वर्षांपूर्वी

    अत्यंत वाचनीय लेख

  4. Amol Suryawanshi

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर.... बराच अफगाणिस्तान समजला

  5.   4 वर्षांपूर्वी

    बाप रे .. लेखक डिसेंबर २०१९ मध्ये अफगाणिस्तानात गेला होता. शेवटचा परिच्छेद म्हणजे wishful thinking चे उत्तम उदाहरण...दीड वर्षात परिस्थिती किती बदलली.. अफगाणिस्तानातील शांतता फसवी होती हे माहित होतेच.. महात्मा गांधीचा उपदेश तालिबान्यांना समजावून सांगायची वेळ अजून गेलेली नाहीये..

  6. NIRANJAN TINAIKAR

      4 वर्षांपूर्वी

    मिलिंद बोकील सरांची लिहिण्याची ओघवती शैली आणि बारीकसारीक गोष्टी नजरेसमोर ऊभी करण्याची ताकद असामान्य आहे. त्यांनी लिहिलेले प्रत्येक विषय, लेख, पुस्तक हे अगदी सखोलपणे अभ्यास करून लिहिलेले असतात. वाचताना तर हरखून जायला होतंच. तसंच ते साहित्य पुन्हा पुन्हा वाचनाचा आनंद देणारं असतं. हा उत्कृष्ट लेख आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल बहुविध चे देखील आभार....



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen