विसावं शतक उजाडलं आणि पाश्चात्त्य जगाला भारतीय संगीताची पहिल्या प्रथम ओळख झाली. ह्याचं श्रेय हजरत इनायतखाँ यांना दिलं पाहिजे. संगीत आणि सुफी तत्त्वज्ञानाचा हा गाढा अभ्यासक अमेरिकेला गेला. तिथल्या लोकांसमोर हजरतसाहेबांनी वीणा-वादन आणि गायन सादर केलं. प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता; परंतु काहीतरी नावीन्यपूर्ण ऐकायला मिळालं असं तिथल्या लोकांना वाटलं हे खरं. पुढे हजरत इनायतखाँ यांनी आपल्या मांडणीत किंचित बदल केला. झणत्काराचं (स्ट्रोक्सचं) संगीत सोडून ते गूढ ध्वनिशास्त्राकडे वळले. माणसाच्या आत आणि चहूबाजूला फिरणाऱ्या अनाहद नादावर त्यांनी लिखाण केलं. सुफी तत्त्वज्ञान आणि संगीत यांचा एकत्रितपणे विचार करून इनायतखाँ यांनी त्या काळात काही सुरेख लेख लिहिले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
उत्कृष्ट लेख. अनुवादित पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे.. विलायतखाँ आणि इमरतखाँ... “लोकांसमोर असतो तेव्हा कलावंत हा किमयागार असतो; परंतु, पडदा पडला नि दिवे विझले के तो माणूस होतो” .... वाह मस्तच...