मिहीरने तिकिटे काढली तेव्हा नक्की किती वर्षांनी घरी जातोय याचा फारसा विचार मनात नव्हता. खूप काळानंतर जातोय एवढाच होता. पण घरी कळवल्यावर मालिनी लगेच म्हणाली, की 'सात वर्षानी येणार तू.' तर मिहीर गप्प झाला. वर्षांचा उल्लेख म्हणजे जणू सगळा दोष आहे त्याचाच. तो दुर्लक्षून मग थोड्या वेळाने म्हणाला की, ‘ती दोघे मिळून येणार आहेत. तो आणि त्याची मैत्रीण सुझन.' तर लगेच मालिनी उद्गारली, 'हो की काय!' स्वरात शंका. मिहीर थोडा वैतागला तेव्हा. याचा अर्थ काय समजायचा? नको आहे का त्यांना घरी यायला? मैत्रीण बरोबर आहे म्हणून? पण मुद्दा तोच तर आहे की सुझनला घर पाहायचे आहे, शहर पाहायचे आहे. म्हणून तर ती येणार आहे.
प्रवासाला जाण्याची तयारी करायला लागल्यावर सुझनने विचारले, “मोसम कसा असेल तिथे?”
मिहीर म्हणाला, “ऑगस्ट आहे, पाऊस असणार.”
"पाऊस?" सुदान कपड्याची घडी घालता घालता थांबली. "कठीण आहे मग.”
मिहीर म्हणाला. "आईबाबा घ्यायला येतील. काहीच कठीण नाही."
सुझनने हातातले कपडे खाली ठेवले आणि मिहीरच्या शेजारी बसून त्याच्या केसांतून हात फिरवून ते विस्कटून टाकले. हसत म्हणाली, "तो प्रश्न आहे का? मला वाटलं, आपण टॅक्सी घेणार.”
मिहीर मग अस्वस्थ बसून राहिला. आता कळलेले की सात वर्षांनी तो घरी जाणार होता. सुझन बरोबर असणार होती. ऑगस्टशिवाय पर्याय नव्हता. पाऊस असणारच. शिवाय नेमानुसार एक दिवस तर धो धो पडणार. सगळीकडे पाणीच पाणी तुंबणार. शहर ठप्प होऊन जाणार. बाहेर पडता येणार नाही. घरातच थांबावे लागणार. सगळ्यांनाच. मग काय आणि कशावर बोलणार?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीविषय तसा गुंतागुतीचा, सानिया यांनी नेहमीप्रमाणे कथा उत्तम प्रकारे उलगडत नेली व त्यांच्या प्रत्येक कथेप्रमाणे पटकन शेवट करून टाकला. खरंतर एवढी दीर्घकथा आहे तर मिहीरचे बाबा परत येऊन त्यांचेही झालेले संवाद नोंदवून मग कथेचा शेवट काही निर्णयात्मक असणं अपेक्षित असताना एकदम कथा संपून गेली.
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीइंटरेस्टिंग. दोन्ही बाजू आलटूनपालटून समोर येत होत्या, फिरता रंगमंच असल्यासारखे वाटत होते....ओघवती कथा...!
Swatita Paranjape
4 वर्षांपूर्वीगोष्ट एवढी भारी आहे त्यातली पुरुष आणि स्त्रिया आणि लैंगिक अत्याचाराचे चित्रण अफलातून. लैंगिक अत्याचार समितीबद्दलचे चित्रण जरा पाहीजे तेवढा सखोल नाहीय त्याचे वाईट वाटले.