तुम्ही आता हा लेख वाचायला घेतला आहे. अनुक्रमणिकेत त्याचे शीर्षक पाहून तुम्ही जाणूनबुजून या पानावर आलांत? म्हणजे तुम्ही स्वत:च्या इच्छेने, जाणीवपूर्वक हा लेख वाचण्याचा निर्णय घेतलांत? की सहज पाने उलटता उलटता तुम्ही या पानावर पोहोचलांत? आणि ते उलटण्यापूर्वी तुम्ही सहज त्याच्यावरून नजर फिरवलीत? हे प्रश्न विचारणे म्हणजे नुसताच शब्दच्छल नाही. आज भलीभली विद्वान मंडळी अशांसारख्या प्रश्नांवर गहन विचार करत आहेत. कारण जर तुम्ही जाणीवपूर्वक या लेखाची निवड केली असेल तर तुम्ही स्वेच्छेने, राजीखुषीने तसा निर्णय घेतला आहे, असे म्हणता येईल. म्हणजे पूर्णत: स्वतंत्रपणे तुम्ही या लेखाची निवड केलीत आणि कुणाच्या कळत-नकळत सांगण्यावरून किंवा तुम्हांला मिळालेल्या प्रच्छन्न, सुप्तही असेल, आदेशानुसार तुम्ही तसे करण्याचे ठरवलेले नाही, असे होईल. म्हणजेच तुमच्या अंगी स्वेच्छा जागृत असेल. तुम्हांला जर विचारले की तुम्ही हा लेख वाचण्याचा निर्णय कां घेतलात तर तुम्ही म्हणू शकाल की मला तसे वाटले म्हणून. माझी मर्जी! खरोखरच तुमची मर्जी? की तसे करण्याचे पूर्वीच निर्धारित केले गेले होते? मर्जी मेरी असे काही खरोखरीच अस्तित्वात आहे की ती केवळ एक निराधार समजूतआहे?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .