माझे(ही) बायोपिक


चित्रपट पाहण्याची खूप आवड असल्याकारणाने बॉलीवूडमध्ये घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांकडे माझे बारीक लक्ष असते. तिथे निर्माण होणाऱ्या प्रायोगिक, करमणूकप्रधान, माहितीपट इत्यादी पटांच्या जोडीला अलीकडेच चरित्रपट या नव्या प्रवाहाची साथ मिळाली आहे. नवशिका पाहुणा म्हणून दबकत दबकत या ग्लॅमर क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या या नव्या प्रवाहाने सिनेजगतात आता चांगलेच बस्तान बसवले आहे ही गोष्ट माझ्या चाणाक्ष नजरेतून निसटलेली नाही.

सिनेक्षेत्रातील नवनव्या प्रकाराचे मी नेहमीच कृतीशील स्वागत केलेले आहे. बालगंधर्व, बाळासाहेब ठाकरे, पु० ल० देशपांडे, काशीनाथ घाणेकर, एम० एस० धोनी या व्यक्तींचे बायोपिक्स थिएटरमध्ये पाहून आल्यानंतर त्या संबंधात मित्रांजवळ, नातेवाइकांच्यामध्ये कौतुकाने बोललेलो आहे. बायोपिक्सचा हा नवा जोमदार प्रवाह असाच वाढत राहील आणि वलयांकित व्यक्तींच्या जोडीला समाजातील उपेक्षित, गरीब, तळागाळातील सामान्य माणसांच्या आयुष्यावरही बायोपिक्स निघत राहतील अशी आशा आणि इच्छा मी अनेकांजवळ अनेक वेळा व्यक्त केली होती.

पण लौकरच माझा भ्रमनिरास झाला. चरित्रपटाची ही नवी लाट फक्त वलयांकित व्यक्तींपुरतीच मर्यादित असून सामान्य नागरिकांना या नव्या प्रवाहात कसलेही स्थान नाही हे माझ्या लक्षात आले. समाजवादी विचार शिरोधार्य मानणाऱ्या माझ्यासारख्याला सिनेक्षेत्रातील अशी विषमता कदापिही मान्य होणे शक्य नव्हते. यांतील काही चरित्रपट पाहून झाल्यानंतर मी बराचसा अस्वस्थ झालो होतो. बायोपिक्ससाठी फक्त मोठ्या लोकांच्या नावांचाच विचार व्हावा आणि मध्यमवर्गीय आणि सामान्य लोकांना यातून पूर्णपणे डावलले जावे हा देशातील धनदांडग्या लोकांचा डाव माझ्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही. मला या विषमतेची अतिशय चीड आली.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen