अंक : प्रिय रसिक, जून २०२१
कोरोनाचा राग येतच होता अशा वातावरणात आणखी एक बातमी आली ती ‘शेखरदादाच्या' जाण्याची.ज्या व्यक्तीला सदैव हसतमुख पाहिलं त्या व्यक्तीला थंड मृत्यूच्या सरणावर पाहायचं हे मनाला न आवडणारं घडत होतं.लेखक, निर्माते शेखर ताम्हाणे यांचं निधन झालं.
तिन्हीसांज हे व्यावसायिक मराठी नाटक २०१६-२०१७ मधे मी दिग्दर्शित केलं.त्रिकुट ह्या संस्थेची स्थापना शेखर आणि राजन ताम्हाणे या दोघांनी केली. शेखर दादा स्वत: एक लेखक, दिग्दर्शक, निर्माते होते. कित्येक एकांकिका, कादंबरी, नाटक यांचं लिखाण करणारे शेखरदादा केमिकल इंजिनियर होते.अल्ट्राटेक, एनव्हायर्नमेंटल कन्सल्टन्सी अँड लॅबोरेटरी याचे मालक आणि संचालक होते. लहानपणापासून लेखन आणि नाटकाची प्रचंड आवड असणाऱ्या शेखरदादांची नाटकं, एकांकिका हिंदी, इंग्रजी, गुजराथी, फ्रेंच या भाषांमधून भाषांतरीत झाली होती त्या शेखरदादांनी मी दिग्दर्शित केलेलं किमयागार नाटक पाहून तिन्हीसांज या नाटकाबद्दल विचारलं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान श्रद्धांजली !
Swatita Paranjape
4 वर्षांपूर्वीमनापासून लिहीलेल्या मधुर आठवणीतून वाहिलेली श्रद्धांजली. अतिशय मनापासून वाहिलेली आणि खूप प्रभावी. डोळ्यात अश्रु आलेच. बहुविधचे, संपदाताईंचे आभार,