आन्नूंच्या आठवणी…


अंक : प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन) मे २०२१

आज आन्नू (पांडुरंग नागेश कुमठा, २५ मे १९२१ - २८ मार्च २०१९) असते, तर शंभर वर्षांचे असते.ते अठ्ठ्यांणव वर्षांचे होईपर्यंत त्यांची प्रसन्न साथ आम्हाला लाभली. ते एक यशस्वी पुस्तक-विक्रेते म्हणून पुस्तक-जगतात प्रसिद्ध होते.त्यांचा 'बॉम्बे बुक डेपो', मराठी पुस्तकांचे माहेरघर म्हणून ओळखला जायचा.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रिय रसिक , मे २०२१
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    गिरगावात राहात असल्याने ललित पुस्तकांच्या खरेदीसाठी बॉम्बे बुक डेपो आणि अभ्यासाच्या पुस्तकांसाठी त्यासमोरील तीन बुक डेपो... लखानी बुक डेपो, स्टुडंट बुक डेपो आणि विद्यार्थी बुक डेपो.. बॉम्बे बुक डेपोची बुक क्लब योजना त्याकाळी अभिनव होती.. दरमहा २० रुपये जमा करायचे आणि वर्षाच्या शेवटी २७५ का ३०० रुपयांची पुस्तके घ्यायची.. १९८० च्या दशकात ३०० रुपयांची पुस्तके एकाच वेळी आणि पैसे न देता घेण्याचा आनंद मोठा होता..( दरमहा पैसे जमा केले आहेत हे त्यावेळी विसरले जायचे)... मॅजेस्टिक थिएटर जवळ मॅजेस्टिक बुक डेपो होताच पण बॉम्बे बुक डेपोच्या दर्शनी भागात मोठ्या शोकेस मध्ये मांडलेली पुस्तके पाहाण्याचा आनंद देखील मोठा होता.. कुमठासाहेब नेहेमी माणसांच्या गराड्यात असायचे.. बॉम्बे बुक डेपो बंद झाला. त्याच दरम्यान वीरकर आहार भुवन, बाबुराव पुरोहित, ब्राह्मण सभेसमोरील कुलकर्णी हॉटेल (बटाटा भाजी प्रसिद्ध) अशी अनेक हॉटेल्स बंद झाली.. सुधीर दामले यांचे नाट्यदर्पण मासिक आणि ऑफिस बंद झाले.. साहित्य संघ मंदिराची रया गेली.. खटाववाडीचे महत्त्व कमी झाले.. तेव्हाच लक्षात आले की गिरगावची संस्कृती उतरणीला लागली.. ..

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    बॉम्बे बुक डेपो व त्यांच्या सर्वेसर्वा आन्नु यांचे बद्दल प्रथमच वाचन झाले ‌‌अशी उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  3. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान माहितीपर लेख आहे .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen