अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१
गंगाधर गाडगीळ यांनी आठवणींच्या गंधरेखा’या पुस्तकातून त्यांचा ज्या साहित्यिकांशी निकटचा संबंध आला त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. लेखनाच्या पहिल्या बहराच्या काळात गाडगीळ यांची सर्वात अधिक गट्टी जमली ती मंगेश पाडगांवकर, वसंत बापट, विंदा करंदीकर आणि सदानंद रेगे या चौकडीशी! या मित्रांबद्दल गाडगीळ यांनी या पुस्तकात ‘साडेतीन कवी आणि एक फसलेला समीक्षक’ हा लेख लिहिला आहे. या लेखातील कविवर्य विंदा करंदीकर यांच्याबद्दलच्या आठवणी खास ‘प्रिय रसिक’च्या वाचकांसाठी देत आहोत.
आम्ही सगळे मुंबईत राहिलेले, रुळलेले होतो. पण विंदा करंदीकर कोल्हापूर, रत्नागिरी वगैरे ठिकाणच्या कॉलेजात काम करून मुंबईत येऊन दाखल झाला होता. पहिल्यानं दुसऱ्या कुठच्यातरी कॉलेजात तो होता. पण नंतर रामनारायण रुईया कॉलेजात त्यानं शिरकाव करून घेतला आणि पुढे मग ती शीवच्या एस. आय. इ. एस. कॉलेजात गेला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .