अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१ कामगार, कष्टकरी, वंचित या वर्गांच्या व्यथा-वेदनांना धारदार शब्दरूप देणाऱ्या आणि त्याद्वारे निरर्थक शब्दांच्या वेढ्यातून कविता मुक्त करणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या प्रतिभेचे विविधरंगी आविष्कार ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन या त्यांच्या संग्रहातून आजही काव्य रसिकांना कधी मंत्रमुग्ध करतात, तर कधी अस्वस्थ करतात. श्रमिकांच्या दैनंदिन आयुष्याची व श्रमशक्तीच्या चढउतारांची स्पंदने सुर्वे ह्यांच्या कवितेत अनोख्या ढंगाने प्रकट होतात. माणूस आणि मेहनत ह्यांचे अतूट नाते, हा त्यांच्या कवितेचा कणा आहे. सुर्वे : नारायण सुर्वे यांची समग्र कविता या ग्रंथातून त्याच्या एकूणच कवितांचा आस्वाद रसिकांना घेता आला. दिगंबर पाध्ये यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेली त्यांच्या ह्या सगळ्याच कवितासंग्रहांना नेहमीच काव्यरसिकांची मागणी असते. दि. १६ ऑगस्ट हा नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या कविता खास वाचकांसाठी पुन्हा एकदा!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .