शरीरातील साठेबाजी


पोटाचा, कंबरेचा घेर वाढतो आहे. डबल हनुवटी होते आहे याचा अर्थ शरीराच्या गरजेपेक्षा जास्त आपण खात आहोत. मग शरीराची गरज वाढवावी लागेल, त्यासाठी शारीरिक श्रम, व्यायाम करावा लागेल. इनपुट- आपले खाणे आणि आउटपूट- शरीराने ते वापरणे यांचे संतुलन हेच आरोग्याचे रहस्य आहे. ते बिघडले, शरीरातील साखर कमी झाली तरी चक्कर येऊ लागते. क्षार कमी झाले तर ब्लडप्रेशर लो होते, कमी होते, आवश्यक मेदाम्ले मिळाली नाहीत तर थकवा येतो, अकाली वार्धक्य येते. शरीराची साखरेची गरज कृत्रिम साखरेपेक्षा गोड फळे, नैसर्गिक मध यांनी पुरवली तर ते अधिक चांगले. खारट चवी साठी सैंधव, बीडलवण वामक, त्याचा पाचक म्हणून उपयोग होतो. फळांना मीठ व साखर लावून खाणे अनावश्यक आहे, तो आपल्या सवयीचा परिणाम आहे. असे खाल्याने मीठ व साखरेचे दुष्परिणाम होतात शिवाय त्या मूळ फळाची चव आपण अनुभवत नाही. आपले अन्न आपण चवीने खायला हवे पण ते किती, तर शरीरात साठेबाजी होणार नाही इतकेच, अकारण संग्रहाचा हव्यास वाईटच, नाही का?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Suhas Joshi

      4 वर्षांपूर्वी

    आजच्या काळासाठी अत्यंत योग्य

  2. Shrikant Athalye

      4 वर्षांपूर्वी

    👍👌 मस्त लेख

  3. Suresh Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    आपल्या शरीराला आवश्यक तेवढे ग्लुकोज गोड न खाता मिळते पण आपण जे साखर टाकलेले पदार्थ खातो त्याची शरीराला सवय लागते कारण त्यात फ्रुकटोज असते.आणि आपण अडिक्शन मुळे हे पदार्थ सोडू शकत नाही .शरीरावर चरबी वाढली तर बिघडत नाही पण फ्रुकटोज हे लिव्हर,हार्ट,लंग्ज,या अवयवांवर चरबी वाढवतात. त्यामुळे लाईफस्टाईल आजार होऊन सर्व घरातील सदस्यांना ते कायमस्वरूपी त्रास देतात.शिवाय साखरेचे अति प्रमाण दातांचे विकार वाढवतात व हाडे ठिसूळ होऊन घूडघे दुखी व अर्थोयटीस होतो.मुलांमध्ये लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि हार्मोन्सचे असंतुलन साखरेचेच परिणाम आहेत.डिप्रेशन आणि ताणतणाव हे मानसिक आजार गोडाचे पदार्थ खाणे किंवा पिणे याचा परिणाम आहेत.हे समजल्यापासून मी व माझ्या कुटुंबाने साखर,गूळ, मध,खडीसाखर आणि साखरेपासून बनलेले सगळे पदार्थ कायम सोडले आहेत.

  4. Medha Vaidya

      4 वर्षांपूर्वी

    एकदम सही लिहिलं आहे

  5. Vinesh Salvi

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद बहुविध....

  6. मंदार केळकर

      4 वर्षांपूर्वी

    अत्यंत योग्य मीमांसा



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen