अन्न आणि मन


आपले विचार आपल्या मनाला नकळत स्वयंसूचना देत असतात. त्यांचा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आपण जाणीवपूर्वक सकारात्मक स्वयंसूचना घेऊ शकतो. मी खात असलेला प्रत्येक घास माझ्या शरीराचे पोषण करणार आहे. माझे बल वाढवणार आहे असे विचार मनात ठेवले तर जेवण केवळ उदरभरण राहत नाही, यज्ञकर्मच ठरते. एकेक घास जठराग्रीच्या यज्ञातील आहुती ठरतो. समोर आलेले अन्न, नाखुषीने, नावे ठेवत खाल्ले तर ते त्रास देते, पचत नाही. पौष्टिक जेवायचे, चवीने खायचे, एकेक घास जाणीवपूर्वक घ्यायचा, त्याचा स्वाद अनुभवायचा त्यातील रस चाखायचा. केवळ अन्नातीलच नव्हे तर त्या क्षणातीलच सर्व रस पंचज्ञानेंद्रियांनी अनुभवायचा असे केले तर रोजचे साधे जेवण देखील एक आनंदाचा सोहळा ठरेल. आपल्याला घर की मुर्गी दाल बराबर लागते. कारण चरचरुन भूक लागलेली नसते . खरी भूक लागली की अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे लक्षात येते. मग साधी कांदा भाकरीही रुचकर लागते. जेवण हे जबरदस्तीने, नाइलाजाने उरकण्याचे एखादे काम नाही किंवा केवळ चवीचे, भोगाचे साधनही नाही, ते एक पवित्र कर्म आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. Swapna Patwardhan

      2 वर्षांपूर्वी

    हे लक्षात घेऊन उदार भरण करेन

  2. Amol Patil

      2 वर्षांपूर्वी

    वा... खुपच छान माहिती... ह्याबद्दल मला फार कमी माहिती होती. पण या लेखाने मला खुप फायदा होणार आहे... धन्यवाद...वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen