थंडी कमी होते व वसंत ऋतू सुरू होतो. या काळात थंड हवामानात साठलेला कफ आजार निर्माण करू लागतो. सर्दी, खोकला, दमा, ताप वाढतात. आता तेलकट, स्निग्ध पदार्थ बंद करून वरी, नाचणी, जव अशी रूक्ष धान्ये, खायला हवीत. कारली, मेथी, कडुनिंबाच्या पानांची चटणी, असे कडू रसाचे पदार्थ, सुंठवडा, आलेपाक खायला हवा. आहारात मधाचा समावेश केला की कफ कमी होतो. कफाचा वारंवार त्रास होणाऱ्यांनी प्रथम धान्य भाजून घेऊन मगच शिजवायला हवे. हवेतील उष्णता वाढत जाते तशी भूक मंदावते. ग्रीष्म ऋतूचा वैशाख वणवा सुरू होतो. उष्ण हवामानात आपल्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून मेंदूला बरेच परिश्रम करावे लागतात. घाम जास्त येतो. शरीरातील पाणी व क्षार कमी होतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून थोड्याशा श्रमानेही थकायला होते. अशावेळी आंब्याचे, कोकमाचे पन्हे, फळांचे रस, ताक, नारळाचे पाणी असे द्रवपदार्थ घ्यायला हवेत. कैरी अंगातील उष्णता कमी करते, कलिंगडे, द्राक्षे, डाळिंब ही फळे शरीरातील पाणी वाढवतात. मूतखडे होऊ देत नाहीत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .